शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या दिवशी ६८८ उमेदवारी अर्ज दाखल !

By admin | Updated: February 4, 2017 02:26 IST

सर्व्हर डाउन; उमेदवारांची धावपळ!

अकोला, दि. 0४- उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (३ फेब्रुवारी) पाच झोन कार्यालयांमध्ये एकूण ६८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजपर्यंंत निवडणूक विभागाकडे ८८१ अर्ज प्राप्त झाले. उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांची एकच गर्दी झाली होती.महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पारदश्री व सोपी व्हावी, या उद्देशातून निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत अवलंबिली; परंतु निवडणूक विभागाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया काही काळासाठी संथगतीने सुरू होती. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. त्यामुळे ही पद्धत उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरली. शेवटच्या दिवशी, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंंत ६८८ उमेदवारांचे अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले. प्रभाग १५ मध्ये एका अपक्ष उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून १0 रुपयाचे पाच हजार किमतीचे शिक्के निवडणुक अधिकार्‍याकडे जमा केले. सर्व्हरवरील ताण वाढला !महापालिका निवडणुकीचा अर्ज यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने भरावा लागला. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंंतच्या अवघ्या चार तासांच्या कालावधीत उमेदवारांना अर्ज सादर करावे लागले. ऑनलाइन उमेदवारी अर्जाची प्रिंट आउट काढून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करताना अनेकांना चांगलीच कसरत करावी लागली. शेवटच्या दिवशी संबंधित वेबसाइटवर अर्ज सादर करणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सर्व्हरवरील ताण वाढला. त्यामुळे काही काळासाठी अर्ज भरण्याची गती संथ झाली होती. आज उमेदवारी अर्जांंची छाननीमनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या स्तरावर ४ फेब्रुवारी रोजी प्राप्त अर्जांंंची छाननी केली जाणार आहे. छाननी केल्यानंतर याच दिवशी सायंकाळपर्यंंत इच्छुक उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी मागे घेतो कोण?राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने उमेदवारांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज मागे घेऊ शकतात. यासाठी ७ फेब्रुवारी तारिख निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात कायम राहणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी ८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. यावेळी उमेदवारी अर्ज मागे कोण घेतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.