शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राईमचे महाराष्ट्रात ६८१ गुन्हे!

By admin | Updated: December 2, 2014 23:40 IST

२0१३ साली सर्वाधिक गुन्हे पुण्यात.

नितीन गव्हाळे /अकोलामहाराष्ट्रात २0१३ साली सायबर क्राईमशी संबंधित ६८१ गुन्हे घडले. सर्वाधिक गुन्हे पुण्यात, तर त्याखालोखाल यवतमाळात अशा प्रकरणांची नोंद करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने राज्यातील सायबर क्राईमबाबत अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी दिली आहे. सोशल नेटवर्किंग साईटसवर बनावट प्रोफाईल तयार करणे, त्या माध्यातून इतरांना मानसिक त्रास देणे, धार्मिक भावना दुखावणे, महापुरुषांचे आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करणे, अश्लील कॉमेंटस करून भावना दुखावणे आदी प्रकार अलिकडे वाढत आहेत. एवढेच नव्हे तर इंटरनेट बँकिगच्या माध्यमातून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकारही सातत्याने घडत आहेत. वाढते सायबर क्राईम समाजासाठी एक चिंतेची बाब ठरत असताना, २0१३ साली या प्रकारचे सर्वाधिक ९७ गुन्हे पूणे शहरामध्ये नोंदविण्यात आले. त्याखालोखाल यवतमाळ जिल्हय़ात ६१, तर ठाण्यात २0 गुन्हय़ांची नोंद आहे. *माहिती तंत्रज्ञान कायद्यातर्गंत नोंदविलेले गुन्हेपूणे शहर           ९७यवतमाळ          ६१ठाणे शहर          ५२औरंगाबाद शहर  ४७मुंबई                 ४0नवी मुंबई           ३१ठाणे ग्रामीण       २४अकोला              २0*इंटरनेटद्वारे फसवणूक, मुंबई अव्वलइंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचे सर्वाधिक ९२ गुन्हे मुंबई शहरात घडले. त्याखालोखाल ठाणेमध्ये ७३, नवी मुंबई शहरामध्ये २0 गुन्हे घडले. *तरूण आरोपींचा भरणा माहिती व तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आर्थिक लुबाडणूक करणे, अश्लील फोटो टाकणे, संवाद साधणे, मानसिक त्रास देणे आदी प्रकार करणार्‍या आरोपींमध्ये ३0 ते ४५ वयोगटातील तरूणांची संख्या ९३ आहे. १८ ते ३0 वर्ष वयोगटातील युवकांची संख्या ६४ आहे. ४५ ते ६0 वर्ष वयोगटातील १९, तर ६0 वर्षावरील गुन्हेगाराची संख्या १ आहे.