शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

६८ काेटी रुपयांतून शहरात विकास कामांचा धडाका; हद्दवाढ क्षेत्रात २८ काेटीतून मुलभूत सुविधांची कामे

By आशीष गावंडे | Updated: October 19, 2023 17:09 IST

मनपाच्या बांधकाम विभागाने संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश जारी केल्यानंतर कंत्राटदारांनी कामांचा धडाका लावल्याचे चित्र आहे. 

अकाेला: राज्य शासनाकडून महापालिका प्रशासनाला प्राप्त झालेल्या ६८ काेटी रुपयांतून शहरात विविध विकास कामांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे. सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना तसेच दलितेत्तर याेजनेंतर्गत मनपाला ३२ काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यामध्ये मनपा प्रशासनाने ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा केला असता सुमारे ४० काेटी रुपये तसेच याव्यतिरिक्त २८ काेटी रुपये निधीतून हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामे निकाली काढल्या जाणार आहेत. मनपाच्या बांधकाम विभागाने संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश जारी केल्यानंतर कंत्राटदारांनी कामांचा धडाका लावल्याचे चित्र आहे. 

महापालिका क्षेत्रात रस्ते, नाल्या, पथदिवे, पाणीपुरवठा, उद्यानांचे साैंदर्यीकरण, पेव्हर ब्लाॅक आदी विकास कामे निकाली काढण्यासाठी राज्य शासनाकडून सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना, नागरी दलित वस्ती सुधार याेजना तसेच दलितेत्तर याेजनेंतर्गत निधी प्राप्त हाेताे. नगराेत्थान व दलितेत्तर याेजनेंतर्गत प्राप्त झालेल्या निधीत मनपाला ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करावा लागताे.

दरम्यान, महापालिका क्षेत्रातील रस्ते, नाल्या व धाप्यांची कामे अतिशय दर्जाहिन हाेत असताना अशी दर्जाहिन कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत न टाकता त्यांची प्रशासनाच्या स्तरावर पाठराखण हाेत आहे. दरम्यान, मनपाला नगराेत्थान व दलितेत्तर याेजनेंतर्गत ३२ काेटी रुपये निधी प्राप्त झाला. यामध्ये मनपाने ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करत ४० काेटी रुपयांतून विकास कामांचे नियाेजन केले. 

भाजपच्या माजी नगरसेवकांना झुकते मापवर्तमानस्थितीत महापालिका बरखास्त असली तरीही प्रभाग निहाय विकास कामांचे प्रस्ताव तयार करणे, त्यासाठी निधीची तरतूद करणे आदी कामे तत्कालीन सत्तापक्षातील प्रभावी पदाधिकारी विजय अग्रवाल यांच्या सूचनेनुसारच निकाली काढली जात आहेत. ४० काेटी रुपयांच्या कामात प्रशासनाने केवळ १२ काेटी रुपयांची कामे सुचविली आहेत. या विकास कामांमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांना झुकते माप दिल्याचे दिसत आहे. यावरुन प्रशासनावर आजही भाजपचीच पकड असल्याचे दिसून येते. 

कनिष्ठ अभियंत्यांची दमछाकहद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन २८ काेटींचा निधी मिळवला. यामुळे शहरात एकूण ६८ काेटींची विकास कामे निकाली काढताना चारही झाेनमधील कनिष्ठ अभियंत्यांची दमछाक हाेत आहे. तर काही अभियंत्यांना कामे समजावून सांगताना माजी नगरसेवकांच्या ताेंडाला फेस आल्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :Akolaअकोला