शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगाच्या नावाखाली शासनाला ४.९० कोटींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 13:59 IST

अकोला: सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना उद्योगासाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त करून घोटाळा करणाऱ्या जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथील संत रविदास मागासवर्गीय औद्योगिक संस्थेकडून वसुलीला सुरुवात झाली आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना उद्योगासाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त करून घोटाळा करणाऱ्या जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथील संत रविदास मागासवर्गीय औद्योगिक संस्थेकडून वसुलीला सुरुवात झाली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांनी ६ जुलै रोजी ४ कोटी ९० लाख रुपये शासनजमा करण्याचे पत्र संस्थेला दिले आहे.राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने २००४-०५ या वर्षापासून मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना उद्योग उभारणीसाठी कर्जासह अनुदान दिले. त्यावेळी अनेकांनी शासकीय दबावतंत्र वापरून निधी लाटण्यासाठी औद्योगिक सहकारी संस्थांची स्थापना केली. त्याआधारे उद्योग उभारणीचे प्रस्तावही तयार केले. त्या प्रस्तावांमध्ये अनेक बाबी बनावट पद्धतीने सादर करण्यात आल्या. उद्योग उभारणीसाठी जमीन नसताना त्याबाबत बनावट कागदपत्रे तयार करणे. विशेष म्हणजे, त्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर होणाºया फेरफारातही घोळ करणे, तहसीलदारांचे बनावट अकृषक आदेश तयार करण्यापर्यंतची मजल मारण्याचेही प्रकार घडले.जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथील संत रविदास मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेने आधी पातूर नंदापूर गावातच चर्मोद्योग निर्मितीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये अनेक कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर अकोला शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात उद्योग उभारणीचा प्रस्ताव देण्यात आला. त्यासाठी शासनाकडून भागभांडवलापोटी २ कोटी ४५ लाख आणि शासकीय मदत म्हणून २ कोटी ४५ लाख रुपये संस्थेला प्राप्त झाले. लेदर गारमेंटच्या नावाखाली असलेला उद्योग प्रत्यक्षात सुरूच झाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळेच या औद्योगिक संस्थांनी शासनाचा निधी लाटण्यासाठीच उद्योग उभारणी केल्याचे उघड झाले. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने याबाबत गंभीर आक्षेपही नोंदवले. त्यातून अनेक संस्थांची चौकशीही सुरू झाली; मात्र काही ठिकाणी ती गुंडाळण्यात आली.

 आरआरसीची कारवाईराज्यातील ज्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अपहाराची रक्कम शासनजमा केली नाही, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा आदेशही देण्यात आला. त्याशिवाय, निधीची वसुली करण्यासाठी जमीन महसुलाप्रमाणे वसुली कारवाई (आरआरसी) करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.

संत रविदास संस्थेवर मेहरबानीराज्यभरात संस्थांकडून वसुलीसाठी आरआरसीची कारवाई सुरू असताना अकोला जिल्ह्यातील संत रविदास मागासवर्गीय औद्योगिक संस्थेकडून त्या पद्धतीने वसुली अद्याप सुरू झालेली नाही. सामाजिक न्याय विभागाने जानेवारीनंतर पुन्हा ६ जुलै रोजी पत्र देत रक्कम शासन जमा करण्याचे म्हटले आहे. महसूल विभागाकडे अद्याप धाव घेतली नाही. विशेष म्हणजे, संस्थेचे पदाधिकारी भाजपशी संबंधित असल्याने पुढील कारवाई होते की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfraudधोकेबाजी