शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

६६0 नव्या गाड्या टाकणार शहराच्या प्रदूषणात भर!

By admin | Updated: April 3, 2017 02:53 IST

हा स्वत:शी आणि निसर्गाशी खेळ नाही का?

अकोला, दि. २- मानवी स्वभाव किती स्वार्थी होतोय बघा.. आपण नेहमी वाढत्या प्रदूषणाविरोधात बोलतो, सरकारला दोष देतो, वेळ आली तर न्यायालयाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो; परंतु विषय जेव्हा स्वहिताचा असतो, तेव्हा मात्र सामाजिक बांधीलकी विसरून केवळ आपल्या फायद्याचाच विचार करतो. याचा पुन्हा एक वाईट अनुभव बीएस-३ सारख्या नाकारलेल्या वाहनांच्या खरेदीनंतर आला आहे. बॅन असलेल्या ६६0 नव्या गाड्या शहराच्या प्रदूषणात आणखी भर टाकणार असल्याने, केवळ स्वार्थासाठी काहींनी डिस्काउंटवर ह्यमरणह्ण घेतले असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व गाड्या पुढील दहा-वीस वर्षे अक्षरश: प्रदूषण ओकणार आहेत; मात्र हे सर्व माहिती असताना केवळ काही पैशांच्या लालसेपोटी त्या गाड्या खरेदीसाठी आपण उड्या मारल्या आणि एका दिवसात निर्बंंंध घालण्यात आलेल्या हजारो गाड्यांची खरेदी केली. हा स्वत:शी आणि निसर्गाशी खेळ असल्याने, या ज्वलंत प्रश्नावर ह्यलोकमतह्णने समाजातील पर्यावरण तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, सर्वांंंनी समाजाच्या या स्वार्थी वृत्तीचा विरोध केला. भारत स्टेज-३ (बीएस-३) या गाड्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालताच, विविध कंपन्यांनी आपल्या डीलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना डिस्काउंटचे प्रलोभन दाखवून या सर्व गाड्यांची विक्री केली. लोकांनीसुद्धा त्या प्रलोभनाला बळी पडत, गाड्यांच्या खरेदीसाठी रांगा लावल्या. अकोला शहरात एका दिवसात ६६0 गाड्यांची विक्री झाली. यात लोकांना निश्‍चितच १0 ते १५ हजार रुपयांचा फायदा झाला आहे; मात्र त्या लालसेपोटी संपूर्ण शहराचे आरोग्य धोक्यात टाकले. त्यामुळे भविष्यात या गाड्यांमधून होणार्‍या प्रदूषणाला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रदूषणाबाबतीत अकोला शहराची काय स्थिती आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यात या नव्या गाड्या आणखी भर घालणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आपला देश आणि समाजाचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय दिला आहे; मात्र असे असतानासुद्धा बॅन असलेल्या गाड्या खरेदी करून, सर्वोच्च न्यायालयाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.