शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पारस येथे ६६0 मेगावॉटचा प्रकल्प मंजूरच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:35 IST

अकोला : पारस येथे २५0 मेगावॉटचा प्रकल्प मंजूर केला होता; पण केंद्र शासनाने २५0 मेगावॉटचे प्रकल्प यापुढे उभारु नका, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यानंतर २५0 मेगावॉटचा प्रकल्प होणार नाही. ६६0 मेगावॉटचा कोणताही प्रकल्प पारस येथे मंजूर नाही, असा खळबजनक खुलासा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांचे उत्तरप्रकल्पग्रस्त समितीबरोबर लवकरच बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पारस येथे २५0 मेगावॉटचा प्रकल्प मंजूर केला होता; पण केंद्र शासनाने २५0 मेगावॉटचे प्रकल्प यापुढे उभारु नका, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यानंतर २५0 मेगावॉटचा प्रकल्प होणार नाही. ६६0 मेगावॉटचा कोणताही प्रकल्प पारस येथे मंजूर नाही, असा खळबजनक खुलासा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला.पारस प्रकल्पासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्या शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या सवलती कायम राहतील. गरजेपेक्षा जास्त वीज राज्याकडे उपलब्ध आहे. याशिवाय खासगी कंपन्याकडेही मुबलक वीज खरेदीसाठी उपलब्ध आहे. अशा स्थितीत नवीन वीज प्रकल्पाची गरज नाही,असेही बावनकुळे यांनी सांगितले. ते आमदार विनायक मेटे यांनी पारस प्रकल्पाविषयी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देत होते. यावेळी बावनुकळे यांनी प्रकल्पग्रस्त समितीबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासनही दिले. आ. मेटे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात सांगितले की, अकोला जिल्ह्यातील पारस येथे २५0 मेगावॅटचे दोन वीज निर्मिती संच होते. त्यानंतर पुन्हा २५0 मेगावॉटचा संच मंजूर करून, तो रद्द करण्यात आला व ६६0 मेगावॉटचा मंजूर करण्यात आला. या प्रकल्पासाठी १४१ शेतकर्‍यांची १३0 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आणि आता सौर उर्जेचा ६0 मेगावॉटचा प्रकल्प करण्यात येत आहे. नवीन वीज निर्मिती प्रकल्पासाठी पाणी नसल्याच्या कारणावरून रद्द करण्यात आला. या प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध आहे. तसेच ज्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी घेतल्या त्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्‍वासन शासन देणार काय? असा प्रश्न आ. मेटे यांनी उपस्थित केला. बावनकुळे यांच्या उत्तरानंतर  उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सौर वीज निर्मिती प्रकल्पही करा, अशी सूचना सरकारला केली. 

प्रकल्प समितीचा पाठपुरावा पारस प्रकल्प संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि प्रवीण भोटकर हे पारस येथे प्रकल्प सुरू होण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी आमदार विनायक मेटे यांच्या माध्यमातून हा विषय विधान परिषदेत उपस्थित केला. आता ऊर्जा मंत्र्यांबरोबर होणार्‍या पारस प्रकल्प संघर्ष समितीच्या बैठकीतून प्रकल्पावर निर्णय होण्याची आशा आहे.