शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावांना महान धरणातून पाणी सोडले!

By admin | Updated: September 20, 2016 01:27 IST

काटेपूर्णा धरणातून 0.८0 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग; ६४ गावांमधील जलसंकट अखेर टळले.

अकोला, दि. १९- खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पुरवठा करण्यासाठी अखेर पाटबंधारे विभागामार्फत महान येथील काटेपूर्णा धरणातून 0.८0 दशलक्ष घनमीटर पाणी रविवारी सायंकाळी काटेपूर्णा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे ६४ गावांमधील जलसंकट टळले आहे. गत जुलैमध्ये पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला होता. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत उन्नई बंधार्‍यातून ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; परंतु ९ सप्टेंबर रोजी उन्नई बंधार्‍यातील पाणी संपले. त्यामुळे गत १२ सप्टेंबरपासून ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. पाणीपुरवठा बंद झाल्याने पावसाळ्यातच ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अकोला उपविभाग कार्यालयामार्फत अकोला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने ६४ गावांसाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी केव्हा सोडण्यात येणार, याबाबत ग्रामस्थांकडून प्रतीक्षा करण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त गत १४ सप्टेंबर च्याह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत पाटबंधारे विभागामार्फत ६४ गावांना महानच्या काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी अखेर १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पाटबंधारे विभागामार्फत महान येथील काटेपूर्णा धरणातून 0.८0 दशलक्ष मीटर पाणी काटेपूर्णा धरणात सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने, ६४ गावांमध्ये निर्माण झालेले जलसंकट टळले आहे.