शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:13 IST

जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातील पाणी  संपल्याने खारपाणपट्टय़ातील  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून,   पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना  पायपीट करावी लागत आहे. गत  २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच  असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप   करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन  असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना  पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे२५ दिवसांपासून मिळाले नाही पाणी उपाययोजना केव्हा होणार?दूषित पाण्याचा वापर; आरोग्य धोक्यात!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातील पाणी  संपल्याने खारपाणपट्टय़ातील  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून,   पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना  पायपीट करावी लागत आहे. गत  २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच  असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप   करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन  असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना  पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून  गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील  धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये  अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४  गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अ त्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा  अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद  करण्यात आला आहे. त्यामुळे  खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍या तील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत  गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला  आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत  जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी  ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गत २५ दिवसांपासून  पाणीपुरवठा बंद असल्याने, तहानलेल्या गावांसाठी तातडीने पाणी पुरवठा करण्याची कोणतीही उपाययोजना जिल्हा परिषद आणि  जिल्हा प्रशासनामार्फत अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे  गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार आणि  पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न ६४ गावांमधील ग्रामस् थांकडून उपस्थित केला जात आहे.

दूषित पाण्याचा वापर; आरोग्य धोक्यात!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद  असल्याने आणि खारपाणपट्टा असल्याने, पिण्यायोग्य पाण्याचे  स्रोत नसल्याने, ६४ गावांमधील ग्रामस्थांना नदी-नाल्याच्या पात्रा तील ‘झिर्‍या’तील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.  दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने, ग्रामस्थांचे आरोग्य  धोक्यात आले आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा  करण्यासाठी टंचाई आराखड्यांतर्गत उपाययोजना प्रस्तावित  करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त  झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.-आस्तिककुमार पाण्डेय,  जिल्हाधिकारी