शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ६३.४४ टक्के मतदान !

By admin | Updated: February 4, 2017 02:41 IST

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये बंद.

अकोला, दि. 0३- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात सातही तालुक्यांतील ६६ मतदान केंद्रांवर सरासरी ६३.४४ टक्के मतदान झाले असून, निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले आहे.विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांत २८0 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील ६६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात एकूण ४७ हजार १५२ मतदार असूून, त्यापैकी ३९ हजार ९१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये २0 हजार ५६४ पुरुष आणि ९ हजार ३४९ स्त्री पदवीधर मतदारांनी मतदान केले. त्यामुळे या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६३.४४ टक्के मतदान झाले. मतदानानंतर अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसचे संजय खोडके, प्राउडिस्ट ब्लॉक इंडियाचे दिलीप सुरोशे, रिपब्लिकन सेनेच्या नीता गहरवाल यांच्यासह अँड. अरुण आंबेडकर, डॉ. अविनाश चौधरी, गणेश तायडे, अँड. संतोष गावंडे, जितेंद्र जैन, डॉ. दीपक घोटे, डॉ. लतीश देशमुख, प्रशांत काटे व प्रा. प्रशांत वानखडे इत्यादी १३ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले.मतपेट्या अमरावतीला रवाना!अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अमरावती येथे होणार आहे. त्यानुषंगाने मतदानानंतर जिल्ह्यातील ६६ मतदान केंद्रांवर सीलबंद करण्यात आलेल्या मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती येथे रवाना करण्यात आल्या.मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ६६ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पदवीधर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.सोमवारी फैसला!अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे होणार आहे. या मतमोजणीत मतपेट्यांमध्ये सीलबंद झालेल्या १३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी बजावला मतदानाचा हक्क; केंद्रांची केली पाहणी !पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोल्यातील मुंगीलाल बाजोरिया विद्यालय या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील आरएलटी, एलआरटी व आरडीजी महाविद्यालय इत्यादी तीन मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.