अकोला, दि. २४-: पोलीस भरतीमध्ये शुक्रवारी ६२७ उमेदवार मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले.पोलीस भरतीच्या प्रक्रियेला बुधवारी प्रारंभ झाला. ६८ जागांसाठी १३ हजार अर्ज आले होते. भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालयात राबविण्यात येत आहे. धावण्याची चाचणी एमआयडीसी परिरसरात घेण्यात येत आहे. उन्हामुळे दुपारच्या आतच प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २४ मार्च रोजी एकूण ९९४ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ७२८ उमेदवार शारीरिक मोजमापात पात्र ठरले. त्यानंतर झालेल्या मैदानी चाचणीमध्ये ६२७ उमेदवार उत्तीर्ण झाले.
पोलीस भरतीमध्ये ६२७ उमेदवार ठरले पात्र !
By admin | Updated: March 25, 2017 01:24 IST