शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी थकविले तीन कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:24 IST

अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्यातील ६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी तीन कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याने अकोला जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेने त्यांना जंगम मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविली आहे.

- संजय खांडेकरअकोला : अकोला-वाशिम जिल्ह्यातील ६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी तीन कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याने अकोला जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेने त्यांना जंगम मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविली आहे. नोटीस पाठविण्यासोबतच वृत्तपत्रातून थकीतदारांची नावे, रक्कम आणि मालमत्ता जाहीर केल्याने अकोला आणि वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.अकोला-वाशिम जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांची नोंदणीकृत पतसंस्था गत अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अकोल्याच्या राजपूत पुरा परिसरातील देवराव बाबा चाळीतून अकोला जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे कामकाज चालते. दोन्ही जिल्ह्यांत ३७५ सभासद असून, आजी-माजी ग्रामसेवक असलेल्यांना कर्ज पुरवठा केला जातो. या पतसंस्थेतून १६१ च्यावर सभासदांनी कोट्यवधींचे कर्ज घेतले आहे. यातील जवळपास ६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी अनेक वर्षांपासून कर्जाची परतफेड केलेली नाही. अशा ६२ आजी-माजी ग्रामसेवकांची नावे पतसंस्थेने काळ्या यादीत टाकली असून, त्यांची कर्ज प्रकरणे सहकारी आणि न्यायालयात ठेवली आहेत. शेवटचा पर्याय म्हणून आता पतसंस्थेने ६२ आजी-माजी ग्रामसेवकांच्या मालमत्तेची जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन २६ कर्ज थकविणाऱ्यांची माहिती प्रकाशित केली आहे. पहिली यादी जाहीर झाली असून, आणखी चार याद्या जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.-वारंवार सूचना देऊनही कोणताच परिणाम सभासदांवर होत नसल्याने पर्यायाने पतसंस्थेने जंगम मालमत्ता जप्ती कारवाई सुरू केली आहे. पतसंस्थेने कायदेशीर मार्ग अवलंबिला आहे.-साहेबराव चव्हाण, अध्यक्ष, जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था, अकोला.-समुपदेशन करून पतसंस्थेने ग्रामसेवक सभासदांकडून वसुली करायला हवी, नावे प्रकाशित करायला नको कायदेशीर असले, तरी ही पद्धत चुकीची आहे. कौटुंबिक अडचणी समजून घेतल्या पाहिजेत.-उल्हास मोकळकर, माजी अध्यक्ष, जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था, अकोला.*दोन कोटींची उलाढाल...शेकडो सभासद असलेल्या जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची दोन कोटींची वार्षिक उलाढाल असून, पतसंस्था नफ्यात आहे. काही सभासदांचा मृत्यू झाल्याने त्यातील काही परिवाराकडून वसुली जवळ-जवळ अशक्य आहे. अशांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, असा सूर समोर येत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला