शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादहून आलेल्या ६० मजुरांना अडविले अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:15 IST

अडविण्यात आलेल्या सर्व मजुरांची गुरुवारी महानगरपालिका वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ असताना हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील मुरेनाकडे जात असलेल्या ६० मजुरांना बुधवारी रात्री अकोल्यात अडविण्यात आले असून, शहरातील खडकी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन येथे जिल्हा प्रशासनामार्फत त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अडविण्यात आलेल्या सर्व मजुरांची गुरुवारी महानगरपालिका वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.एका ट्रकद्वारे हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील मुरेना या गावाकडे जात असलेल्या ६० मजुरांना १ एप्रिल रोजी सायंकाळी पातूर येथे पोलिसांनी अडविले व अकोल्यात आणले. रात्री १० वाजताच्या दरम्यान अकोल्यात आणलेल्या या मजुरांची अकोल्याचे उपविभागीय अधिकारी नीलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे यांनी माहिती घेतली. मध्य प्रदेशातील मुरेना या गावी जाण्यासाठी मजुरांकडून करण्यात आलेली मागणी प्रशासनाकडून अमान्य करण्यात आली व अकोल्यातच थांबण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यानुसार अकोल्यातील खडकी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन येथे ६० मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली. गुरुवार, २ एप्रिल रोजी महानगरपालिका वैद्यकीय पथकामार्फत या मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कपड्यांचे केले वितरण!हैदराबादहून मध्य प्रदेशातील आपल्या गावाकडे जात असलेल्या या मजुरांना अकोल्यात अडविण्यात आले. अंगावर व्यवस्थित कपडे नसल्याने त्यांच्या मागणीनुसार गुरुवारी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्यावतीने ६० मजुरांना आवश्यक कपड्यांचे वितरणही करण्यात आले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगार