शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

५८७ केंद्रांवर होणार महापालिकेसाठी मतदान!

By admin | Updated: February 7, 2017 03:25 IST

अकोला मनपा निवडणूकीसाठी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट देणार उपलब्ध करून

अकोला, दि. ६-महापालिकेच्या महासंग्रामासाठी राजकीय पक्षांप्रमाणेच मनपाची प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने ५८७ मतदान केंद्रांची निश्‍चिती केली असून केंद्रांची संख्या लक्षात घेता संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांना कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटसह इतर साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी मनपाची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. २१ फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया होणार असून २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मतदान केंद्र निश्‍चित करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर यांच्याकडे सो पवली. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेली मतदान केंद्रांची शोध मोहीम तूर्तास थांबली आहे. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन शहरालगतच्या गावांचा मनपात समावेश झाला. त्यामुळे लोकसंख्या वाढीसह भौगोलिक क्षेत्रफळातही वाढ झाली. प्रभाग पुनर्रचना केली असता २0 प्रभागांची निर्मिती झाली असून ८0 सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे. अर्थातच, या सर्व बाबी लक्षात घेता मतदान केंद्रांसाठी मनपात समाविष्ट झालेल्या नवीन भागासह महापालिकेच्या मराठी, उर्दू, हिंदी शाळा, शहरातील जिल्हा परिषद शाळा, विद्यालये, खासगी कॉन्व्हेंटमधील वर्ग खोल्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ५८७ मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आले असून एका मतदान केंद्रावर ८00 ते ८५0 मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी यादी होईल प्रसिद्धउमेदवारी अर्ज मागे घेणार्‍या उमेदवारांना ७ फेब्रुवारीपर्यंंंत अवधी दिला आहे. निवडणुकीत कायम राहणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी ८ फेब्रुवारी (बुधवारी) रोजी प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी मनपात तसेच मनपाच्या वेबसाइटवर मतदान केंद्रांच्या यादीसह मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयारमहापालिका प्रशासनाने मतदान केंद्रांची यादी पोलीस प्रशासनाकडे सोपवली आहे. पोलिसांनी संवेदनशील मतदान केंद्रांची वेगळी यादी तयार केली असून त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणा त बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने जुने शहरातील पोळा चौक, तसेच बाळापूर रोडवरील मनपा उर्दू मुलांची शाळा, डाबकी रोडवरील आंबेडकर मैदानालगतची उर्दू मुलांची शाळा क्रमांक १0 आदींसह अकोला पश्‍चिम विभागातील बहुतांश शाळांचा समावेश आहे.