शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा बियाणे अनुदानाचे ५७ लाख लाटले

By admin | Updated: November 14, 2016 03:08 IST

लाभ शेतक-यांऐवजी कृषी केंद्रांच्या घशात.

सदानंद सिरसाट अकोला, दि. १३- शेतकर्‍यांना शासनाने अनुदानावर दिलेल्या १९१४ क्विंटल हरभरा बियाणे वाटपात अकोला शहरातील महाबीजच्या दोन वितरकांनी अनुदानाची जवळपास ६0 लाखांपर्यंतची रक्कम शेतकर्‍यांऐवजी स्वत:च्या घशात घातली आहे. या प्रकाराचा उलगडा करण्यात महाबीज आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग असर्मथ ठरत आहे. शासनानेच बियाणे वाटप घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, हे बियाणे दुसर्‍या केंद्रांना वाटप केल्याचे सांगत त्याची कुठलीही माहिती या दोन वितरकांनी शासकीय यंत्रणेला दिलेली नाही. शासनाने शेतकर्‍यांना रब्बी हंगामासाठी हरभरा बियाणे अनुदानित दराने दिले. त्यासाठी प्रतिकिलो बियाण्यामागे ३0 रुपये महाबीजला दिले. त्यानुसार महाबीजने ८0 रुपये किलोप्रमाणे ३0 किलोची बॅग त्यांच्या वितरकांना दिली. अकोला शहरातील दोन वितरकांना त्यांना स्वत: वाटप करण्यासाठी ३६८४ बॅग दिल्या. त्यामध्ये एकाला १३९६ तर दुसर्‍याला २२८८ बॅग मिळाल्या. त्याचवेळी एकाने ४0१९ आणि दुसर्‍याने २0२९ बॅगचे वाटप कृषी सेवा केंद्रांना केल्याची माहिती आहे. महाबीजच्या त्या दोन वितरकांनी स्वत:कडचे बियाणे म्हणून ३६८४ बॅग वाटप केलेल्या शेतकर्‍यांची यादी महाबीजला दिली. त्यामध्ये दोघांनीही जवळपास ५0 ते ५२ केंद्रांना बियाणे दिल्याचे म्हटले आहे, तर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे दिलेल्या माहितीत २0 ते २५ केंद्रांचाच उल्लेख आहे. त्या दोन वितरकांनी शासनाच्या दोन विभागासोबत सुरू केलेला खेळ पाहता, अनुदानित बियाणे वाटपात मोठाच घोळ झाल्याचे दिसत आहे; मात्र तो शोधून काढण्यात कृषी विभाग सर्मथ नसल्याचे गेल्या काही दिवसांच्या चौकशीवरून स्पष्ट होत आहे. शासनाच्या ५७ लाखांच्या अनुदानाला चुनाहरभरा बियाणे सवलतीच्या दरात शेतकर्‍यांना देण्यासाठी शासनाने अनुदानाची रक्कम महाबीजकडे दिली. महाबीजने शासकीय अनुदानित बियाणे वाटप प्रक्रिया त्याच पद्धतीने राबविणे आवश्यक होते; मात्र शासनाने दिलेल्या अनुदानाचा लाभ शेतकर्‍यांना होण्याऐवजी महाबीजच्या वितरकांनाच होईल, अशाच पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. त्यातून शेतकर्‍यांना हक्कापासून डावलून शासनाच्या लाखोंच्या अनुदानाला चुना लावण्यात आला आहे. वितरकांकडून दिशाभूल करणारी माहितीमहाबीजचे वितरक असलेल्या या दोन केंद्रांकडून महाबीज, कृषी विभाग आणि माध्यमांची दिशाभूल केली जात आहे. मानेक टॉकीज परिसरात असलेल्या केंद्र संचालकाने आधी सहा ते सात केंद्रांना बियाणे दिल्याचे सांगितले होते. आता ५२ केंद्रांची नावे महाबीजला दिली आहेत.