शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी ५७ ग्रामपंचायती घेणार दुष्काळमुक्तीचा ठराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:36 IST

शिर्ला : पाण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पातूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण विकास आराखडा मंजूर करणारा ठराव स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत मांडणार असल्याची माहिती पातूर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी ‘लोकमत’ला दिली.    

ठळक मुद्देजलसंधारण विकास आराखडा मंजूर करणारा ठराव स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पाण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पातूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण विकास आराखडा मंजूर करणारा ठराव स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत मांडणार असल्याची माहिती पातूर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी ‘लोकमत’ला दिली.        पातूर तालुक्यात १00 हून गावे तथा ५७ ग्रामपंचायती आहेत. आज शिर्ला, पांगरताटी, चारमोळी ही जलसंधारणाची कामे केलेली गावे वगळता इतर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पाणीटंचाईची भीषणता आणि दुष्काळाची तीव्रता अधिक गडद होत चालली आहे. त्यावर गतवर्षी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सिनेअभिनेते अमिर खान यांच्या संकल्पनेतून पातूर तालुक्यातील ६५ हून गावांनी थोड्या अधिक प्रमाणात जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात तालुक्यातील शिर्ला, पांगरताटी, चारमोळी यशस्वी ठरले आहेत.  यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत निम्माही पाऊस तालुक्यात पडला नाही. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक वाढत जाणार आहे. त्यावर पाणी फाउंडेशनने उभी केलेली जलचळवळ, वाढता लोकांचा सहभाग, त्यातून होणारी जलसंधारणाचे काम कायमस्वरूपी दुष्काळाला हरवू शकतात. या वर्षी १५ऑगस्टच्या विशेष ग्रामसभेतून प्रत्येक गावातून पाच कार्यकर्ते त्यात दोन महिलांचा अंतर्भाव करून निवड करावी, त्याबरोबरच गावात करावयाच्या जलसंधारण कामांचा आराखडा मांडून ठराव घ्यावा, अशी विनंती पाणी फाउंडेशनचे पातूर तालुका समन्वयक सुभाष नानोटे, प्रफुल्ल कोल्हे यांनी गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना केली होती. त्यावर  त्यांनी  लगेचच सूचना दिल्या आहेत.  स्वातंत्र्य चळवळनंतर प्रथमच जलचळवळ दुष्काळ मुक्तीसाठी उभी राहत आहे. दुष्काळाच्या चोरट्या पावलांचा अंदाज घेऊन पूर्वनियोजन करणारी कदाचित जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरेल, असे वाटते.