शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात ५४६ पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:17 IST

जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. डिसेंबर २०२० पर्यंत कोविडचा संसर्ग दर घसरला होता. त्यामुळे रुग्णसंख्याही कमी ...

जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. डिसेंबर २०२० पर्यंत कोविडचा संसर्ग दर घसरला होता. त्यामुळे रुग्णसंख्याही कमी झाली होती. नव्या वर्षात संसर्गाचा दर पुन्हा वाढू लागला आहे. दररोज सरासरी १० ते २० अहवाल पॉझिटिव्ह यायचे, ते जानेवारीमध्ये वाढून २५ ते ३०वर आले होते. फेब्रुवारी महिन्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. गत आठवडाभरात कोरोनाने जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. ८ फेब्रुवारीला जिल्ह्यात केवळ २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र त्यानंतर रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होताना दिसू लागले. ८ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यात सर्वाधिक १२७ रुग्ण १३ फेब्रुवारी राेजी आढळून आले. वाढत्या रुग्णसंख्येने जिल्हा प्रशासन आणि आराेग्य विभागाची चिंता वाढविली आहे. यासाठी अकोलेकरांची बेफिकिरी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. वेळीच सतर्कता न बाळगल्यास जिल्ह्यातील स्थिती पुन्हा सप्टेंबर २०२० सारखी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्यविभागातर्फे करण्यात आले आहे.

मृत्यूचा दर ३ टक्क्यांवर

जिल्ह्यात कोराेनाचा रुग्णदर वाढत असला तरी मृत्यूचा दर कमी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३४२ जणांचा मृत्यू झाला. गत महिन्यापर्यंत कोरोनाचा हा मृत्युदर ३.२ टक्क्यांवर होता, तो आता घसरून तीन टक्क्यांवर आला आहे.

असा वाढला आठवड्याचा आलेख दिवस - पॉझिटिव्ह रुग्ण - बरे झालेले रुग्ण - मृत्यू

८ फेब्रुवारी - २० - २२ - ००

९ फेब्रुवारी - ७२ - ९५ - ३

१० फेब्रुवारी - ६२ - १२२ - ००

११ फेब्रुवारी - ६८ - १०८ - ०१

१२ फेब्रुवारी - १०६ - २७ - ००

१३ फेब्रुवारी - १२७ - २६ - ००

१४ फेब्रुवारी - ९० - - ००

जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या वाढ होत आहे. त्यावर अंकुश लावण्यासाठी प्रत्येकाने स्वत: खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल्यास पॉझिटिव्ह येण्याची शक्यता कमी असते. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे तसेच नियमित हात धुवावे या नियमांचे पालन करावे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला