शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
6
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
7
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
8
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
9
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
10
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
11
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
12
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
13
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
14
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
15
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
16
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
17
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
18
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

५४६ ग्रामपंचायतींमध्ये तयार होणार विकास आराखडा!

By admin | Updated: June 9, 2016 02:08 IST

‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेने नेमले प्रभारी अधिकारी.

संतोष येलकर /अकोलाग्रामपंचायतींचे स्वउत्पन्न, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि चौदाव्या वित्त आयोगाद्वारे प्राप्त होणार्‍या निधीतून 'आमचं गाव, आमचा विकास' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींमध्ये विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत गत मे अखेरपर्यंत जिल्ह्यातील पंचायत समिती गण स्तरावर प्रभारी अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.चौदाव्या वित्त आयोगाचा निधी मिळविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय गत ४ नोव्हेंबर २0१५ रोजी शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार सन २0१५-१६ ते २0१९-२0 या कालावधीसाठी जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींच्या स्तरावर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना विविध करांच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी, शासनाकडून प्राप्त होणारा जमीन महसूल उपकर, मुद्रांक शुल्क अनुदान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणारा निधी, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी, स्वच्छ भारत अभियान, लोकसहभाग आणि जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध होणार्‍या निधीचा विचार करून ग्रामपंचायत स्तरावर पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. आराखडा तयार करताना ग्रामपंचायतींना अपेक्षित स्वनिधीच्या दुप्पट कामे पुढील पाच वर्षांसाठी प्रस्तावित करावी लागणार आहेत. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विकास आराखडा तयार करण्याचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले आहे. लोकसहभागातून विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती गण स्तरावर प्रभारी अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये विस्तार अधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांचा समावेश आहे.या ग्रामपंचायती तयार करणार विकास आराखडा!तालुका         ग्रामपंचायतीअकोला             ११0आकोट              ८३बाश्रीटाकळी       ८२बाळापूर            ६६तेल्हारा             ६२पातूर               ५७मूर्तिजापूर        ८६एकूण             ५४६