शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांसाठी ५१३ मेट्रिक टन धान्यसाठा मंजूर

By admin | Updated: August 10, 2015 01:39 IST

अकोला जिल्ह्यातील लाभार्थी शेतक-यांना मिळणार २ रुपये किलो गहू, ३ रुपये किलो तांदूळ.

संतोष येलकर/ अकोला: पावसाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील एपीएल केशरी कार्डधारक लाभार्थी शेतकर्‍यांना २ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वितरित करण्यासाठी ५१३ मेट्रिक टन धान्यसाठा शासनाकडून शुक्रवारी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या पावसानंतर राज्यातील अनेक भागात पावसाने दांडी मारली. खरीप पेरण्यांनंतर पाऊस आला नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला. नापिकीच्या परिस्थितीत शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याच्या घटना होऊ नयेत, यासाठी औरंगाबाद व अमरावती विभागातील जिल्ह्यांमधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल (केशरी कार्डधारक) शेतकरी कुटुंबातील सदस्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय २४ जुलै रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार लाभार्थी शेतकर्‍यांना २ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी ऑगस्ट महिन्याकरिता शासनामार्फत ५१३ मेट्रिक टन धान्यसाठा मंजूर करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या याद्या तयार करण्याचे काम जिल्ह्यातील सातही तालुक्यात रास्तभाव दुकानांमार्फत सुरू करण्यात आले असून, याद्या तयार झाल्यानंतर, जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.