शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओसाड रानावर एकाचवेळी लावली ५00 झाडे

By admin | Updated: October 2, 2015 02:20 IST

निंभा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांचा अभिनव उपक्रम.

संतोष येलकर / अकोला : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची संकल्पना.. विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग.. आणि वृक्ष लागवडीच्या अभिनव उपक्रमातून मूर्तिजापूर तालुक्यातल्या निंभा शिवारातील दोन एकर ओसाड रानावर गुरुवारी एकाच दिवशी अन् एकाचवेळी ५00 झाडे लावण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात गावोगावी वृक्ष लागवड केली जाते. यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे; मात्र सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात झालेल्या वृक्ष लागवडीचे प्रमाण बघता, जिल्ह्यातील हे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नसतानाच निंभा येथे एकाच दिवशी (गुरुवारी) आणि एकाच वेळी ५00 झाडे लावण्यात आली. निंभा शिवारात ९७ एकर ई-क्लास जमीन असून, त्यापैकी २ एकर ओसाड जमिनीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्यासह निंभा येथील विठ्ठल रुख्माई विद्यालयाच्या २५0 विद्यार्थी आणि २५0 ग्रामस्थांनी पाच मिनिटात एकाचवेळी वृक्षरोपण करीत ५00 झाडे लावली. विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून ओसाड रानावर वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र गोपकर, देवानंद गणोरकर, सरपंच जयश्री देशमुख, उपसरंपच, ग्रामपंचायत सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते ए.एस.नाथन, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम.कुळकर्णी, सर्मथ शेवाळे, गटविकास अधिकारी जी.पी.अगते आणि विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.