शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील ५0 टक्के रेती घाटांचा लिलाव

By admin | Updated: October 10, 2016 03:11 IST

पन्नास टक्के घाटांवर रेती माफियांची नजर.

अकोला, दि. 0९- जिल्हय़ातील रेती घाटांच्या लिलाव प्रक्रियेत एकूण घाटांपैकी पन्नास टक्के घाटांचा लिलाव रविवारी झाला. त्यातून महसूल विभागाला ६ कोटी ६६ लाख रुपये मिळाले; मात्र उर्वरित घाटांतून रेती माफिया अवैध उत्खनन करून विभागाला कोट्यवधींचा चुना लावण्याच्या तयारीत असल्याचे लिलाव प्रक्रियेतून दिसत आहे. रेती घाटांचा लिलाव करण्यासाठी जिल्हय़ात १२९ घाट आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली; मात्र त्यापैकी ६४ घाटांसाठीच निविदा प्राप्त झाल्या. प्राप्त निविदेनुसार ऑनलाइन लिलाव करण्यात आला. त्यामध्ये निविदाप्राप्त सर्वच घाटांचा लिलाव झाला. त्यापोटी महसूल विभागाला ६ कोटी ६६ लाख ६६ हजार ८८४ रुपये मिळाले. विशेष म्हणजे, मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वच घाटांचा लिलाव झाला, तर पातूर, बाश्रीटाकळी व अकोट तालुक्यांतील एकाही रेती घाटासाठी निविदा आल्या नाहीत. त्यामुळे लिलावही झाला नाही. बाळापूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात असलेल्या रेती घाटांपैकी केवळ तीन घाटांचा लिलाव झाला. या तालुक्यातील घाटांमध्ये मोठय़ा प्रमाणात रेतीचे साठे आहेत; मात्र ते विकत न घेता अवैध उत्खनन करण्याचा सपाटा रेती माफियांकडून लावला जातो. त्यासाठीच लिलाव प्रक्रियेतून घाट घेण्यास विलंब करण्याचेही प्रकार घडतात. तालुका             एकूण          रेती घाटअकोला                   २८                १२बाळापूर                  २२                 0३मूर्तिजापूर               ३0                 ३0तेल्हारा                   २१                 १९पातूर                      0३                 00बाश्रीटाकळी             १५                 00आकोट                   १0                  00एकूण                   १२९                   ६४उर्वरित रेती घाटांचा लिलाव करण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामध्ये पातूर तालुक्यातील घाटांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सोबतच शासनाला अपेक्षित महसूल मिळणार आहे. - डॉ. रामेश्‍वर पुरी, जिल्हा खणिकर्म अधिकारी, अकोला.