शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

५0 लाखांच्या ‘आरसीएच’ घोटाळय़ाचा ‘एसीबी’कडून तपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:19 IST

मनपाच्या आरसीएच कार्यालयामध्ये २00४ ते २0१0 या कालावधीत आरोग्य योजनेमध्ये ५0 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला होता. नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार घोटाळय़ाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तपास सुरू केला असून एसीबीने मनपाच्या आरसीएच कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देमनपाच्या ‘आरसीएच’ विभागातील घोटाळा‘एसीबी’चे अधिकारी करताहेत दस्तावेजांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण योजना (आरसीएच) अंतर्गत मुले आणि महिलांसाठी आरोग्यासंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात येतात. मनपाच्या आरसीएच कार्यालयामध्ये २00४ ते २0१0 या कालावधीत आरोग्य योजनेमध्ये ५0 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला होता. नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार घोटाळय़ाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तपास सुरू केला असून एसीबीने मनपाच्या आरसीएच कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज तपासण्यास सुरुवात केली आहे.मनपा आरसीएच कार्यालयातील घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर या घोटाळय़ात महापालिकेच्या काही अधिकार्‍यांचासुद्धा समावेश असल्याची शक्यता वर्तविली होती. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोटाळय़ाचा तपास सुरू केल्यामुळे मनपा वतरुळाचे लक्ष वेधल्या गेले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून राष्ट्रीय एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण योजनेसाठी नियमित लसीकरण, जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण योजना, पल्स पोलिओ मोहीम आदी उपक्रमांसाठी लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त होते. २00४ ते २0१0 या कालावधीत आरसीएच कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी अनुदानाच्या रकमेत अपहार केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींनुसार २0१३ मध्ये विधानसभेत आरसीएच घोटाळय़ावर चर्चा झाली. त्यानंतर नगरविकास मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, विभागीय आयुक्तांना या प्रकरणात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. विभागीय आयुक्तांनी १६ आरोग्य योजनांपैकी आठ योजनांमधील अनुदानाची तपासणी करून अहवाल राज्य शासनाकडे पाठविला. अहवालात लसीकरण, जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन, पल्स पोलिओ डोस ११ लाख ७0 हजार, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत १३ लाख ४७ हजार वाहन भाड्यासंदर्भात ४ लाख २0 हजार आणि हजेरी रजिस्टर व मे. मुंदडा एजन्सीला १ लाख ५७ हजार, धनादेश अदा करण्यासाठी ४१ हजार रुपये, तसेच अग्रिम रक्कम देण्यासंदर्भात १0 लाख ४७ हजार रुपये, कृती प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी ए.सी.एम.सी. मॅनेजमेंट पुणे यांना दिलेल्या कंत्राटसंदर्भात ४ लाख १८ हजार रुपये आणि संगणक खरेदी व्यवहारात ३ लाख ८९ हजार रुपये असे एकूण ४९ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चाबाबत संशय व्यक्त केला. 

यांच्या कार्यकाळात झाला गैरप्रकार मनपाच्या आरसीएच कार्यक्रमांतर्गत २00४ ते २0१0 या कालावधीत झालेल्या गैरप्रकाराची जबाबदारी चार अधिकार्‍यांची आहे. या कालावधीत हे चार अधिकार्‍यांकडे मनपा आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी होती. त्यांच्या कार्यकाळात हा गैरप्रकार घडला. यात डॉ. उज्ज्वल कराळे (१ एप्रिल २00४ ते ३१ मार्च २00९), डॉ. छाया देशमुख (१ एप्रिल २00९ ते १ सप्टेंबर २00९), डॉ. अस्मिता पाठक (२ सप्टेंबर २00९ ते २५ जुलै २0१0) पर्यंत आणि डॉ. प्रभाकर मुद्गल (२६ जुलै २0१0 ते ६ ऑक्टोबर २0११) पर्यंत आरोग्य अधिकारी म्हणून जबाबदारी होती. या चार अधिकार्‍यांच्या कार्यकाळात विविध आरोग्य योजनेंतर्गत ५0 लाख रुपयांच्या खर्च झालेल्या अनुदानाच्या रकमेत घोळ असल्याचे दिसून आले आहे. नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार एसीबीचे अधिकारी दोन दिवसांपासून घोटाळय़ाशी संबंधित दस्तावेजांची तपासणी करीत असल्याने मनपा वतरुळात खळबळ उडाली आहे.-