खेट्री, आलेगाव येथे गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांनी सहकारी उपनिरीक्षक गणेश नावकार, गणेश महाजन, आदिनाथ गाठेकर, सुधाकर करवते, दत्ता हिंगणे, महादेव देशमुख, गजानन पोटे, गौरव खत्री यांच्यासह खेट्री येथे धाड टाकली. शे. युसुफ शे. राजू याला गोमांस विक्री करताना रंगेहाथ पकडून त्याच्या जवळून १५ किलो गोमांस व साहित्य असा २ हजार ८०० रुपयांचा तसेच आलेगाव येथे धाड टाकून शे. बिलाल शे. अमीर याला गोमांस विक्री करताना रंगेहाथ पकडून त्याच्या जवळून ३५ किलो गोमांस व इतर साहित्य असा ७ हजार ८५० असे दोन कारवायांमध्ये नऊ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून शिरपूर येथील आरोपी शे. युसुफ शे. राजू आणि आलेगाव येथील शे. बिलाल शे. अमीर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५० किलो गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST