शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढच्या वर्षी ५0 कोटी वृक्ष लावणार!

By admin | Updated: January 29, 2017 02:39 IST

हरित सेनेची नोंदणी जोरात, नोंदणीत अकोला तिस-या क्रमांकावर.

अकोला, दि. २८-पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ३३ टक्के वनांची गरज आहे; पण अलीकडे वनक्षेत्र कमी झाले असून, त्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. पुढच्या वर्षी राज्यात ५0 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी हरित सेना (ग्रीन आर्मी) तयार करण्यात येत आहे. त्यासाठीची नोंदणी राज्यात सुरू आहे. अहमदनगर, नाशिक, यवतमाळनंतर अकोल्याचा नोंदणीत तिसरा क्रमांक आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित चार दिवसीय राज्यस्तरीय वसंत कृषी प्रदर्शनात वन्यजीव, सामाजिक वनीकरण व वन विभागाच्यावतीने दालन उघडण्यात आले आहे. या दालनात हरित सेनेची नोंदणी करण्यात येत असून, शनिवारी एकाच दिवशी ५६0 नागरिक, शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीनंतर प्रत्येक सदस्याला किमान दहा वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात येत आहे. या सदस्याला प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. हरित सेनेचे सदस्य झालेल्या सदस्याने वृक्ष लागवड, संवर्धनासह इतरांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. राज्यात यासाठीची नोंदणी सुरू आहे. राज्यात अहमदनगर व नाशिक प्रथम क्रमांकावर असून, यवतमाळ द्वितीय तर अकोला नोंदणीत तिसर्‍या क्रमाकांवर आहे.अकोला जिल्हय़ात वन्यजीव, वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाला आठ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, तर वन विभागाला एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.ग्रीन आर्मी सदस्यास सवलत!हरित सेना (ग्रीन आर्मी) सदस्यास वन विभागाचे इको टुरिझम, सर्किट हाऊस, जंगल सफारीसाठीच्या सफारी गाड्यामध्ये विशेष सवलत मिळणार आहे.हरित सेनेची नोंदणी सुरू झाली असून, अहमदनगर, नाशिक, यवतमाळनंतर या नोंदणीत अकोला तिसर्‍या क्रमाकांवर आहे. वनक्षेत्र वाढविण्यासोबतच गावागावांत वृक्ष लागवड व्हावी, हा यामागील उद्देश आहे.गोविंद पांडे,प्रसिद्धिप्रमुख, वन विभाग तथा वन्यजीव प्रमुख, अकोला.