शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी ५ कोटीचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:56 IST

उपलब्ध निधीतून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी गत उन्हाळ्यात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी ४ कोटी ९९ लाख ३० हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत २२ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.२०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांची कामे करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने नवीन विंधन विहिरी, कूपनलिका, तात्पुरत्या पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, खासगी विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा इत्यादी कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी १४ कोटी ३६ लाख ३२ हजार रुपये निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी यापूर्वी ८ कोटी ८१ लाख ७४ हजार रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. त्यानंतर ४ कोटी ९९ लाख ३० हजार रुपयांचा निधी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत २२ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून जिल्हा परिषदमार्फत जिल्ह्यात करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारण उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.उपाययोजनानिहाय कामांचा असा प्राप्त झाला निधी !जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी ४ कोटी ९९ लाख ३० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामध्ये नवीन विंधन विहिरी व कूपनलिका -७८ लाख ५४ हजार रुपये, तात्पुरत्या पूरक नळ योजना -६५ लाख ७० हजार रुपये, नळ योजना विशेष दुरुस्ती -१ कोटी ४४ लाख रुपये, खासगी विहिरींचे अधिग्रहण -८६ लाख ८२ हजार रुपये आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या कामाचा खर्च भागविण्यासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद