शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

४९२ उमेदवारांवर होणार कारवाई!

By admin | Updated: February 22, 2016 02:21 IST

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नाही; निवडणूक लढण्यास ठरणार अपात्र

संतोष येलकर / अकोलासहा महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या उमेदवारांपैकी ४९२ उमेदवारांनी अद्यापही निवडणूक खर्च सादर केला नाही. निवडणूक खर्चाचे विवरणपत्र सादर न करणार्‍या या उमेदवारांवर पाच वर्षांंसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.गत ऑगस्ट २0१५ मध्ये जिल्ह्यात २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक निकालानंतर, दोन महिन्यांच्या आत (६0 दिवस) निवडणूक खर्चाचे विवरणपत्र संबंधित तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर, उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाचा अहवाल सादर करण्याचा आदेश, उपजिल्हाधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक) मार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्यात आला होता. या पृष्ठभूमीवर यासंदर्भात जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात तहसील कार्यालयामार्फ त जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४९२ उमेदवारांनी अद्यापही निवडणूक खर्चाचे विवरणपत्र सादर केले नाही. निवडणुकीचा खर्च सादर न करणार्‍या या उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.