शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कुरिअरच्या ट्रकमधून ४८0 मोबाइल लंपास

By admin | Updated: July 26, 2016 01:59 IST

नागपूर-अकोलादरम्यानची घटना.

अकोला : नागपूरवरून जळगाव जात असलेल्या एका खासगी कुरिअर कंपनीच्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८0 मोबाइल लंपास केल्याचा प्रकार सोमवारी रात्री उजेडात आला. सुमारे ५ लाख ४५ हजार रुपयांचे हे मोबाइल असून, अकोला ते नागपूर या दरम्यानच अज्ञात चोरट्यांनी हे मोबाइल पळविले. याप्रकरणी ट्रकचालकाने खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, पोलिसांनी नोंद करून प्रकरण नागपूर पोलिसांकडे वर्ग केले आहे.नागपूर येथील रहिवासी कुणाल रुपचंद बागडे हे एम एच ४0 एन ५७८0 क्रमांकाचा बाबा कुरिअर सर्व्हिसचा ट्रक घेऊन नागपूरवरून अकोला मार्गे जळगाव खांदेश येथे निघाले होते. सोमवारी पहाटे त्यांनी अकोल्यातील कुरिअरचे साहित्य खाली करण्यासाठी ट्रकची पाहणी केली असता, ट्रकच्या मागचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यानंतर ट्रकमधील साहित्याची तपासणी केली असता, ४८0 मोबाइल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या मोबाइलची किंमत सुमारे ५ लाख ४५ हजार रुपये असून, चालत्या ट्रकमध्येच अज्ञात चोरट्यांनी हा प्रताप केल्याची माहिती चालक बागडे यांनी खदान पोलिसांना दिली. नागपूरवरून निघाल्यानंतर आष्टी चौक येथे ट्रकच्या पाठीमागील भागात दरवाज्याचा आवाज आला होता; मात्र रोडवरील खड्डय़ांमुळे हा आवाज झाल्याचे चालकाला वाटल्याने त्यांनी अकोल्यापर्यंत लक्ष दिले नाही; मात्र अकोल्यातील कुरिअरचे साहित्य खाली उतरविण्यासाठी त्यांनी ट्रकमधील साहित्याची तपासणी केली असता, यामधील ४८0 मोबाइल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. खदान पोलिसांनी चौकशी सुरु केली असून, प्रकरण नागपूर पोलिसांकडेही वर्ग करण्यात आले आहे.