शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

४.८0 कोटींची होणार विकास कामे

By admin | Updated: February 24, 2016 01:54 IST

अकोला शहरात चार कोटी ८0 लाख रुपयांच्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला: प्रभागातील विकास कामांसाठी मनपाला मूलभूत सुविधा अंतर्गत प्राप्त २ कोटी ४0 लाखाच्या प्रस्तावाला मंगळवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर यांनी मंजुरी दिली. या निधीत मनपाने उर्वरित ५0 टक्के हिस्सा जमा केल्यामुळे शहरात चार कोटी ८0 लाख रुपयांच्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी शासनाकडून मनपाला कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १0 कोटी ९५ लाख रुपये, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत २ कोटी ५0 लाख, दलितेतर योजनेंतर्गत ३ कोटी २३ लाख आणि मूलभूत सुविधेंतर्गत २ कोटी ४0 लाख रुपये मनपाला प्राप्त झाले. मनपाच्या बांधकाम विभागाने जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवलेल्या नागरी दलित वस्ती सुधार योजना आणि दलितेतर योजनेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यापाठोपाठ २ कोटी ४0 लाखाचा मूलभूत सुविधांचा प्रस्तावसुद्धा जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला. या निधीमध्ये मनपाला उर्वरित ५0 टक्के आर्थिक हिस्सा जमा करणे भाग होते. त्यानुसार मनपानेसुद्धा उर्वरित हिस्सा जमा केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीनंतर विभागीय आयुक्तांच्या प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा होती. मंगळवारी अचानक विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर अकोल्यात दाखल झाले असता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मूलभूत सुविधेचा प्रस्ताव सादर केला. क्षणाचाही विलंब न लावता विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. यादरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवकांच्या भूमिकेमुळे सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेचा प्रस्ताव अद्यापही तयार होऊ शकला नाही. हा प्रस्ताव कधी तयार होतो, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.