शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक पिशव्यांचा ४५ क्विंटलचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:55 IST

अकोला : ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा ४५ क्विंटलचा साठा रविवारी महापालिका प्रशासनाने जप्त केला. मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देमहापालिका उपायुक्तांच्या नेतृत्वात कारवाईदोन गोडावूनमध्ये सापडला ५0 मायक्रॉन कॅरीबॅगचा मोठा साठा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा ४५ क्विंटलचा साठा रविवारी महापालिका प्रशासनाने जप्त केला. मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.मनपा पूर्व झोन अंतर्गत गुड मार्निंंग पथकाद्वारे रविवारी हगणदरी भागाची तपासणी सुरू होती. दरम्यान, कॅरीबॅग विकणारा फेरीवाला दिसून आला. त्याच्याकडे ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा आढळल्याने पथकातील कर्मचार्‍यांनी त्याला सदर पिशव्या कोठून आणल्यात याची माहिती विचारली. त्यावर फेरीवाल्याने तेलीपुरा चौकातील पवन बॅग हाउसचे नाव सांगितले. त्यानंतर मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या कानावर ही बाब टाकली गेली. त्यानंतर मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या पथकाने प्रोप्रायटर लीलाराम जेठवाणी यांच्या पवन बॅग हाउस आणि गोडावूनची झाडाझडती घेतली. दोन गोडावूनमध्ये ५0 मायक्रॉन कॅरीबॅगचा मोठा साठा येथे सापडला. घटनास्थळावरून ४५ क्विंटल ८0 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सोमवारी संचालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत अकोला महानगरपालिका क्षेत्रात अस्वच्छता पसरविणार्‍या तसेच ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या बंदी असलेल्या कॅरीबॅग वापरात आणून कचरा व प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. शहरात कुठे असे नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, श्याम बगेरे, आरोग्य निरीक्षक संजय खोसे, प्रवीण खांबोरकर, सुरेश पुंड, शैलेश पवार, प्रशिष भातकुले, प्रशांत जाधव, कुणाल भातकुले यांनी केली.