अकोला - महाराष्ट्र औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक २ मध्ये असलेल्या एका उद्योगाच्या कार्यालयातून सुमारे ४ लाख ६६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ३0 मे रोजी घडली. या प्रकरणी कंपनीच्या मालकाने सोमवारी दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी कामगारावर चोरीचा गुन्हा दाखल केला.गोरक्षण रोडवरील रहिवासी विजय दिनकर पोकळी ५८ यांची एमआयडीसी क्रमांक २ मध्ये कंपनी आहे. त्यांच्या कंपनीत सुमारे ५0 च्यावर कामगार कामावर होते. मात्र काही दिवसांपासून हे कामगार कमी झाले असून, सद्यस्थितीत या कंपनीत अचलपूर येथील सदर बाजारातील रहिवासी काशीनाथ शर्मा हा एकमेव कामगार कार्यरत आहे. ३0 मे रोजी या कामगाराने कंपनीच्या कपाटातील सुमारे ४ लाख ६६ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याचा आरोप विजय पोकळी यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीद्वारे केला. यावरून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी काशीनाथ शर्मा (रा. अचलपूर) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.(प्रतिनिधी)
एमआयडीसीत ४.५ लाखांची चोरी
By admin | Updated: June 10, 2014 14:20 IST