शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

४.३९ कोटी अपहार; ‘बीडीओं’ना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 13:56 IST

जबाबदार सरपंच, सचिवांच्या नावे जिल्हा परिषदेकडे सादर करावी, असे पत्र जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला दिल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या निधीमध्ये ४ कोटी ३९ लाखांचा अपहार उघड झाल्यानंतर त्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी जबाबदार सरपंच, सचिवांच्या नावे जिल्हा परिषदेकडे सादर करावी, असे पत्र जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे रक्कम वसुलीची कारवाई लवकरच सुरू होणार आहे.ग्रामपंचायतींना विविध विकास कामे करण्यासाठी शासनाच्या योजनांचा निधी मिळतो. त्याशिवाय, वित्त आयोगाचा निधी, मुद्रांक शुल्क, गौण खनिज स्वामित्वधनाची रक्कमही मिळते. सोबतच विविध कराच्या रूपात वसुली केली जाते.अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्या रकमांच्या खर्चाचा हिशेब अद्ययावत नाही. लेखा परीक्षणाच्या काळात दस्तऐवजही उपलब्ध करून दिले जात नाहीत. त्यातच अनेक सरपंच, ग्रामसेवकांनी मनमानीपणे रक्कम काढून खर्च केल्याचे प्रकारही घडतात. गेल्या काही वर्षात घडलेल्या या सर्व बाबी नियमित लेखा परीक्षण अहवालात उघड झाल्या आहेत. त्यामध्ये वसूलपात्र रक्कम आणि जबाबदारीही निश्चित झाली आहे. सर्वच गावांतील सरपंच, ग्रामसेवकांकडून ती रक्कम वसूल करावी, याबाबतच्या नोटिसा पंचायत विभागाकडून सातत्याने दिल्या जात आहेत. गटविकास अधिकाºयांकडून कारवाई होत नसल्याने आता जिल्हा परिषद प्रशासनाकडूनच कारवाई होणार आहे.त्यासाठी गटविकास अधिकाºयांनी संबंधित ग्रामपंचायतींच्या जबाबदार सरपंच, सचिवांची रकमेसह नावे द्यावी, असे पत्र गटविकास अधिकाºयांना देण्यात आले आहे.

५३७ ग्रामपंचायतींमध्ये अपहारलेखा परीक्षण अहवालात जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींमध्ये अपहाराची ६४९ प्रकरणे आहेत. त्यामध्ये सामान्य फंड, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनांचा समावेश आहे. त्या प्रकरणात एकूण ४ कोटी ३९ लाख ८६ हजार २९८ रुपयांचा अपहार झाला आहे. सामान्य फंडातून अपहार झाल्याचे ३७४ प्रकरणे असून, त्यामध्ये ३ कोटी ११ लाख ५,७४३ रुपयांवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद