शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘लेक शिकवा’ अभियानासाठी ४३४ शाळा!

By admin | Updated: May 27, 2017 00:46 IST

मुलींची गळती रोखण्यासाठी प्रयत्न: शिक्षण विभाग राबविणार अभियान

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिक्षण विभागाच्या वतीने येत्या शैक्षणिक सत्रापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ४३४ शाळा टार्गेट करण्यात आल्या असून, या शाळांमध्ये हे अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. इंग्रजी शाळांकडे वाढलेला पालकांचा ओढा, जिल्हा परिषद शाळांना लागलेली विद्यार्थ्यांची गळती पाहता, शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान सुरू केले आहे. विशेषत: ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांविषयी आकर्षण वाढले असून, आपली मुले-मुली दर्जेदार इंग्रजी शाळांमध्ये शिकविण्यासाठी पालक धडपड करताना दिसून येतात. त्यातही जिल्हा परिषद शाळांमधील मुलींची संख्या दिवसेंदिवस घसरत आहे. सोबतच गरीब परिस्थितीमुळे अनेक मुलींना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. जिल्हा परिषद शाळांमधील मुलींची संख्या कमी होऊ नये, या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ४३४ शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे.विद्यार्थिनींना शिक्षण घेता यावे, त्यांनी शाळा सोडू नये, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थिनी शिक्षणापासून दूर जाऊ नयेत, म्हणून शासनाने विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्यासोबतच सायकल भेट, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेशसाठी अनुदानसारख्या योजना सुरू केल्या आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींना या सर्व योजनांचा लाभ देण्यात येऊन त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा निश्चित करून त्या शाळांमध्ये लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींची होणारी कमी संख्या पाहता, शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्याची गरज आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा विद्यार्थिनींना लाभ देऊन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. - प्रकाश मुकुंदशिक्षणाधिकारी, माध्यमिक