शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात आढळले मधुमेह, उच्चरक्तदाबाचे ४२७५ रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:33 IST

तब्बल ४,२७५ रुग्ण रक्तदाब व मधुमेहाचे आढळून आल्याचे महापालिकेच्या अहवालावरून समोर आले.

अकोला: माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत शहरातील दोन लाख ४२ हजार ४६१ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेले ६१ रुग्ण आढळून आले असून, तब्बल ४,२७५ रुग्ण रक्तदाब व मधुमेहाचे आढळून आल्याचे महापालिकेच्या अहवालावरून समोर आले.महापालिकेतर्फे शहरात माझे कुटुंब माझी जबाबदारी, अभियान हाती घेण्यात आले असून, या अंतर्गत घरोघरी जाऊन प्रत्येकाचे तापमान व आॅक्सिजन पातळी तपासली जात आहे. अभियानासाठी महापालिकेतर्फे १५० पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकांनी आतापर्यंत ७२,३५१ घरांना भेटी देऊन तपासणी केली आहे. आरोग्य पथकांच्या अहवालानुसार, शहरातील तब्बल दोन लाख४२ हजार ४६१ नागरिकांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीतून केवळ ६१ नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत, तर ५५ नागरिकांना कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात आले आहे. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. कोरोनाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे हा या अभियानामागील हेतू आहे; परंतु अभियानातून कोरोनाबाधित रुग्ण अत्यल्प आढळून आले, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, दररोज कोरोनाचे सरासरी शंभर रुग्ण आढळून येत आहेत; मात्र अभियानांतर्गत कोरोना बाधितांची संख्या कमी आढळून येत असून, सर्वाधिक रुग्ण हे रक्तदाब व मधुमेहाचे सापडले आहेत.अशी आहे आकडेवारीएकूण नागरिकांची तपासणी - २,४२,४६१रक्तदाब, मधुमेहासारखा दुर्धर आजार - ४,२७५लक्षणे असलेले रुग्ण - ६१कोविड केअर सेंटरमध्ये संदर्भित - ५५अ‍ॅपमध्ये माहिती अद्ययावत - १७,८९८रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांवर लक्षकोरोना विषाणूचे ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणारे व रक्तदाब, मधुमेह अशा आजारांच्या रुग्णांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना आरोग्य पथकाच्या निगराणीखाली ठेवणे, या अभियानामुळे शक्य होणार असल्याचेही महापालिका आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत दोन लाखापेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये रक्तदाब, मधुमेहासारखा दुर्धर आजार असणारे ४,२७५ रुग्ण आढळले. या रुग्णांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष देणार आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात.- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या