शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

४२ शाळांमधील दुष्काळग्रस्त विद्यार्थी धनादेशापासून वंचित!

By admin | Updated: April 26, 2017 01:32 IST

विद्यार्थ्यांचे नुकसान: शिक्षण विभागाने सूचना देऊनही शाळांनी नेले नाहीत धनादेश

अकोला : दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचे मार्च, एप्रिल २०१६ मध्ये परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील २,३८८ विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांचे धनादेशसुद्धा तयार केले; परंतु जिल्ह्यातील ४२ शाळांनी शिक्षण विभागाकडून अद्यापपर्यंत शिक्षण विभागाकडून धनादेश नेलेच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या शाळांमधील शेकडो विद्यार्थी धनादेशापासून वंचित आहेत. २०१६ मध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळी वातावरण होते. शेतातील पिके बुडाली. शेतकरी व त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने जिल्ह्यात काही भाग दुष्काळग्रस्त जाहीर केले आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला; परंतु तोपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केला होता. त्यामुळे हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचा आदेश शिक्षण विभागाला देण्यात आला. शिक्षण विभागाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र पाठवून शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती मागविली होती; परंतु अनेक शाळा, महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती नसल्यामुळे अडचणी येत होत्या; परंतु शिक्षण विभागाने सातत्याने विद्यार्थ्यांची माहिती मागविल्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या बँक खात्याचे क्रमांक मिळविले आणि शिक्षण विभागाकडे सादर केले. शिक्षण विभागाकडे आलेल्या माहितीनुसार, २३०६ विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांचे धनादेश तयार केले आणि जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे धनादेश शिक्षण विभागाकडून प्राप्त करून घेण्यास सांगितले. धनादेशाची तारीखही गेली!जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांनी वारंवार सूचना दिल्यानंतर शाळांनी धनादेश घेतले; परंतु अद्यापही जिल्ह्यातील ४२ शाळांनी विद्यार्थ्यांचे धनादेश प्राप्त करून घेतले नाही, त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना धनादेशापासून वंचित राहावे लागत आहे. शाळांच्या दुर्लक्षामुळे धनादेशाची तारीखसुद्धा निघून गेली आहे.