शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये दलित वस्तीत देणार ४०० नवीन विद्युत जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:05 IST

अकोला : अकोला जिल्ह्यातील ३४ गावांचा समावेश असून, वीज जोडणी देण्याची प्रकिया सुरु झाली आहे.

ठळक मुद्दे ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबीर लावण्यात येणार असून, या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात १४ एप्रिल ते ३०एप्रिल या दरम्यान ‘ग्रामस्वराज्य’अभियान राबविण्यात येणार आहे.

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात १०० टक्के विद्युतीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत राज्यभरातील १९२ गावांत १४ एप्रिल ते ३०एप्रिल या दरम्यान ‘ग्रामस्वराज्य’अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ३४ गावांचा समावेश असून, वीज जोडणी देण्याची प्रकिया सुरु झाली आहे.राज्यातील ज्या गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यात अकोला जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये जवळपास ४०० नवीन विद्युत जोडण्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबीर लावण्यात येणार असून, या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे अशा ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सदर गावांमध्येही या अभियाना अंतर्गत सौभाग्य योजनेतील तरतुदींप्रमाणे १०० टक्के वीज जोडणी दिल्या जाणार आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून, ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी या सर्व ३४ गावात मोठया संख्येत शिबीरे लावण्यात येणार आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी होऊन, सौभाग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.या गावांचा आहे समावेशअकोला उपविभाग - वल्लभनगर, पळसो (बु.) , कासमपूर, कोठारी, सोनाळा, खरप (बु.), हिगंणा म्हैसपूर, रिधोराअकोट उपविभाग - रोहनखेड, हिंगणी(बु.), दहीहांडा.बाळापुर उपविभाग - निंबा, कवठा, उरळ, मोरझाडी, चिंचोली, नकाशी, भरतपूर.बार्शीटाकळी उपविभाग - दोनद(बु.), विरहित.मुर्तिजापूर उपविभाग - दुधलम, लाखपुरी, मंगरूळ(कांबे), गोरेगाव, चिखली, अनभोरा, बोरटा, पोहीपातुर उपविभाग - तुलंगा(बु.), सुकळी, भंडारज, आस्टूलतेल्हारा उपविभाग - वरखेड, उबरखेड, खैरखेड

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण