शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्‍यांना ६0 लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:11 IST

दर्यापुरातील बनोसा येथील एका व्यापार्‍याने अकोला होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्‍यांना तब्बल ६0 लाखांनी गंडा दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. लक्ष्मी ट्रेडर्सच्या नावे या व्यापार्‍याने दिलेले धनादेश वटविल्या जात नसल्याने होलसेल मार्केटमधील व्यापार्‍यांची दिवाळी काळी होत आहे.

ठळक मुद्देदलालाच्या मध्यस्थीने फसवणूक लवकरच गुन्हे दाखल होण्याचे संकेत

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दर्यापुरातील बनोसा येथील एका व्यापार्‍याने अकोला होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्‍यांना तब्बल ६0 लाखांनी गंडा दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. लक्ष्मी ट्रेडर्सच्या नावे या व्यापार्‍याने दिलेले धनादेश वटविल्या जात नसल्याने होलसेल मार्केटमधील व्यापार्‍यांची दिवाळी काळी होत आहे.दर्यापूर बनोसा येथील एका व्यापार्‍याने अकोला होलसेल बाजारातून दोन वर्षांंंत अनेक व्यवहार करून व्यापार्‍यांचा विश्‍वास संपादित केला. खदान परिसरात असलेल्या  मुल्लानी चौकातील   एका दलालाच्या माध्यमातून हा व्यापारी व्यवहार करीत होता मागील ऑगस्ट महिन्यात या व्यापार्‍याने दलालाच्या माध्यमातून तांदूळ, गहू, ज्वारी, सुपारी, साबुदाणा, शेंगदाणे, बेसन, मूग, तूर, चना, उडीद दाळींची खरेदी केली. या व्यवहारापोटी त्याने होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्‍यांना जवळपास ४0 लाखांचे लक्ष्मी ट्रेडर्सचे धनादेश दिलेत. २0 लाखांचा माल क्रेडिटवर उचलला. ऑगस्टमध्ये झालेल्या या व्यवहारापोटी दिलेले लक्षावधीचे धनादेश वटविल्या न गेल्याने आणि नगदची रक्कमही अचानक थांबविल्या गेल्याने अकोल्यातील व्यापार्‍यांना फसगत झाल्याचे समोर आले. होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्‍यांनी एकत्रित येऊन या ठगाचा शोध आता सुरू केला आहे.  विशेष म्हणजे अकोल्यातील व्यापार्‍यांना ठगवून बनोसा येथे या ठग व्यापार्‍याने किराणा दुकान थाटल्याचे समजते.

बनोसाचा व्यापारी अनेकांना ‘चावला’दर्यापूरच्या बनोसा येथील हा ठग व्यापारी  पोलिसांच्या रेकॉर्डवर हिस्ट्रीशीटर असल्याचे समोर येत आहे. याआधी या व्यापार्‍याने इलेक्ट्रिकचे दुकान टाकून अनेकांना चुना लावला. त्यानंतर सिमेंट व्यापारात गंडा घातला. आता किराणा बाजारातील व्यापार्‍यांना लुटले आहे. त्याच्यावर धनादेश अनादरचे अनेक न्यायालयीन खटले सुरू असल्याची माहिती व्यापार्‍यांना मिळाली आहे. या सर्व प्रकारावरून हा ठग व्यापारी अनेकांना ‘चावला’ असल्याचे स्पष्ट होत आहे.

 प्रकरण पोलिसांच्या कानावरअकोल्यातील होलसेल किराणा बाजारातील व्यापार्‍यांना लक्षावधीने गंडविल्या गेल्याची बाब जुने शहर पोलिसांच्या कानावर गेली आहे. याप्रकरणी सामूहिक तक्रार करण्याच्या सूचनाही पोलिसांनी व्यापार्‍यांना केल्या आहे. सामूहिक लेखी तक्रार नोंदविण्याची तयारी होताच याप्रकरणी गुन्हा नोंदविल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.

अकोल्यातही होते वास्तव्यखदानच्या स्मशानभूमीच्या घाटाजवळ काही दिवस हा व्यापारी वास्तव्यास होता. त्यामुळे दलालीचा व्यवसाय करीत असलेल्या एका सोबत त्याचे संबंध जुळले. या ठग व्यापार्‍याने काही सहकार्‍यांच्या मदतीने अकोलाच्या कॉटन मार्केटमधील बाजारपेठेतच कमी दरात हा माल विक्री  केल्याचेही बोलले जात आहे.-