शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

४0 हजारांवर शेतकर्‍यांना मिळेना अन्न सुरक्षा ‘कवच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:28 IST

अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे  वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0  केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी  गहू, तांदळाचा लाभ केव्हा मिळणार?

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे  वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0  केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटात समाविष्ट दारिद्रय़ रेषेखालील (बीपीएल) आणि अत्योदय योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकांना दरमहा रास्तभाव दुकानांमधून धान्याचा लाभ देण्यात येतो. दरम्यान, राष्ट्रीय  अन्न सुरक्षा योजनेच्या प्राधान्य गटात समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल )शेतकर्‍यांना प्रती किलो तीन रुपये दराने गहू आणि प्रती किलो दोन रुपये दराने तांदूळ वितरीत करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २४ जुलै रोजी २0१५ रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात दरमहा गहू व तांदळाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हय़ात २ लाख ७५ हजार ५४४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी शेतकरी असून, त्यापैकी २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४0 हजार ८८0 केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणे बाकी आहे. त्यामुळे धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार आणि प्रत्यक्षात सवलतीच्या दरातील गहू व तांदळाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१ लाख ३७ हजार क्विंटल धान्य नियतनाची मागणीराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक २ लाख ७५ हजार ५४४ लाभार्थी शेतकर्‍यांना धान्य वितरित करण्यासाठी ऑगस्ट महिन्याकरिता १ लाख ३७ हजार ७७0 क्विंटल धान्याचे नियतन मंजूर करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये ८ हजार २६६ क्विंटल गहू आणि ५ हजार ५१0 क्विंटल तांदूळ नियतनाचा समावेश आहे.