शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणी पिल्याने ४0 जण आजारी

By admin | Updated: March 24, 2017 02:19 IST

बोरगाव वैराळे येथील घटना

बोरगाव वैराळे(जि. अकोला), दि. २३- बोरगाव वैराळे गावाला पाणीपुरवठा करणारी कूपनलिका ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे मागील एक महिन्यापासून बंद पडल्याने, ग्रामस्थांना पिण्यासाठी एकतर पूर्णा नदीचे दूषित पाणी किंवा ग्रामपंचायतने तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या कूपनलिकेचे खारे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. गावातील ३0 ते ४0 टक्के लोकांना हगवण आणि उलटीच्या आजाराने ग्रासले आहे. बोरगाव वैराळेची लोकसंख्या दोन हजार असून, या गावात सन २000 पासून स्वतंत्र पाणीपुरवठा दुधाळा शेतशिवारातील कूपनलिकेवरून होत होता. यावर्षी भरपूर पावसाळा होऊनदेखील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे एक महिन्यापासून गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, गोरगरिबांना पूर्णा नदीचे दूषित पाणी किंवा ग्रामपंचायतने तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या गावातील काळे कूपनलिकेचे खारे पाणी पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्राने पंधरा दिवसांपूर्वी स्थानिक ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकारी बाळापूर यांना सादर केला असून, तत्काळ हे पाणी पिण्यासाठी वापरणे बंद करण्यात यावे, अशी सूचनादेखील सदर पत्रात केली आहे; मात्र सदर पत्राची कुठलीही दखल ग्रामपंचायत व पंचायत समिती बाळापूर यांच्याकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे बोरगाव वैराळे गावात ग्रामस्थ सर्रास हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने गावातील ३0 ते ४0 टक्के लोकांना हगवण आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने हे ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात इलाज करण्यासाठी जात आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्रात संख्या वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. इंगळे यांनी दोन दिवसांपूर्वी स्थानिक ग्रामपंचायत आणि पंचायत समिती बाळापूर यांना बोरगाव वैराळे गावातील दूषित पाणीपुरवठा बंद होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी दुसर्‍यांदा स्मरणपत्र दिले आहे. अद्याप बोरगाव वैराळे गावातील पाणीपुरवठा जुन्या कूपनलिकेवरून करण्यासाठी ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारच्या हालचाली सुरू केल्या नाहीत.