शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टय़ातील ४ लाख हेक्टर जमिनीचा होणार कायापालट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 02:23 IST

जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविणार प्रकल्प : रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांना यश

अकोला : अमरावती विभागातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील खारपाणपट्टयात मोडणार्‍या ४ लाख १६ हजार हेक्टर जमिनीचा कायापालट होणार आहे. राज्य व केंद्र सरकार तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने खारपाणपट्टय़ाचा विकास करण्यात येणार आहे. पश्‍चिम विदर्भातील तीन जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये मोडणार्‍या खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी १६ डिसेंबर २0१५ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात जागतिक बँकेचे अधिकारी व कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ.जैन, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव मालिनी शंकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ सुभाष टाले, कृषी विभागाचे सह संचालक आणि इतर अधिकार्‍यांसोबत चर्चा झाली होती. खारपाणपट्टा विकास कामांबाबत आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये खारपाणपट्टा विकासासाठी डॉ. पंदेकृविच्या सहकार्याने सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रिसर्स अँण्ड डेव्हल्पमेंट प्रोजेक्ट स्थापन करण्याची मागणी आ. सावरकर यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाठपुरावा करून खारपाणपट्टय़ासाठी त्याचा होणारा फायदा याबाबत माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. दिल्ली येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळ निवारणासाठी १0 हजार कोटी रुपयाची मागणी केली. तसेच शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यांसाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने योजना राबविण्यासाठी ४ हजार कोटी आणि सिंचनाच्या योजना राबविण्यासाठी ७ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा या पूर्णा नदीच्या खारपाणपट्टय़ातील गावातील समस्यासंबंधी पंतप्रधानांकडे व्यथा मांडल्यावर त्यांनी या परिसरातील ४ लाख १६ हजार हेक्टर जमिनीच्या विकासासाठी निधी देण्याकरिता तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे जागतिक बँकेच्या सहाय्याने तिन्ही जिल्ह्यातील १६ तालुक्यातील खारपाणपट्टय़ातील गावांना नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. त्यामुळे या परिसरातील ९ लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे.