शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

३९८ उमेदवार अविरोध

By admin | Updated: July 25, 2015 01:57 IST

अकोला जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ३९0१ उमेदवार रिंगणात.

अकोला : जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी (गुरुवारी) जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये सातही तालुक्यात ३९८ उमेदवारांच्या अविरोध निवडीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. १ हजार ४८४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, जिल्ह्यात ३ हजार ९0१ उमेदवार ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात उरले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी २0 जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण ६ हजार २५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यायांमध्ये करण्यात आली. त्यामध्ये १५१ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले, तर ६ हजार १0८ उमेदवारी अर्ज पात्र ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवार, २३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत होती. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यात १ हजार ४८४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. दरम्यान, जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात विविध ग्रामपंचायतींच्या ३९८ जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज उपलब्ध झाले नसल्याने, ३९८ उमेदवारांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. संबंधित उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी संबंधित तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्‍यांकडून करण्यात येणार आहे. १ हजार ४८४ उमेदवारांनी निवडणुकीतून घेतलेली माघार आणि ३९८ उमेदवारांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याने, जिल्ह्यात ३ हजार ९0१ उमेदवार ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात असल्याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले.