अकोला: अकोला व वाशिम जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक घेण्यात येत असून, या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शुक्रवारी ३९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामध्ये प्रामुख्याने जगदीश मुरुमकार, मुकुंदराव मेडशीकर,किसनराव गवळी,डॉ.सुभाषचंद्र कोरपे व सेवकराम ताथोड यांच समावेश आहे. ११ उमेदवारांची अविरोध निवड झाली असल्याने आता २१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी ९४ उमेदवारांचे १४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, २४ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत होती. शुक्रवारपर्यंत ३९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने विजय अनंतकुमार पाटील, जगदीश अवधूतराव मुरुमकार, मुकुंदराव संपतराव मेडशीकर, किसनराव कुंडलीकराव गवळी,सेवकराम महादेव ताथोड, डॉ.सुभाषचंद्र कोरपे यांच्यासह ३९ उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकीत ११ उमेदवार अविरोध झाल्याने, आता ९ मतदारसंघात २१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले. ९ मतदारसंघात येत्या ५ मे रोजी या मतदान घेण्यात येणार आहे.
जिल्हा बँक निवडणूकीत ३९ उमेदवारांची माघार
By admin | Updated: April 25, 2015 02:15 IST