शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

बारमाही रस्त्यांची ३७ गावे ‘अवघड’

By admin | Updated: May 26, 2017 03:06 IST

मुख्यालयाचे अंतरही वादग्रस्त : बसफेरी नाही म्हणून ठरविले ‘अवघड’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील काही अपवाद वगळले, तर सर्वच गावे बारमाही रस्त्यांनी जोडलेली आहेत. विविध कारणांमुळे महामंडळाच्या बसफेऱ्या नसल्याचा आधार घेत जिल्ह्यातील ९३ पैकी ३७ गावे शिक्षकांना सेवा देण्यासाठी अवघड असल्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. त्यातच मुख्यालयापासून ३० ते ४५ कि.मी. अंतरावर असलेल्या गावांचाही समावेश केल्याने शासन निर्णयातील अवघड क्षेत्र ठरविण्याच्या निकषावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.शासनाने जिल्ह्यांतर्गत बदल्यांसंदर्भात १५ मे २०१४ रोजी दिलेल्या आदेशातून शिक्षकांना वगळले. त्यांच्यासाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या निर्णयानुसार नव्याने धोरण निश्चित केले. त्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र ठरविण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार अकोला जिल्ह्यात ९३ गावे अवघड असल्याचे जाहीर करण्यात आले; मात्र त्यामध्ये घेतलेल्या निकषाचा आधार पाहता शासन निर्णयातील निकषच कसे तकलादू आहेत, हेच निष्पन्न होत आहे. खासगी वाहनांची रीघ, तरीही दळणवळणास अवघड गावेजिल्हा परिषदेने अवघड ठरविलेल्या ९१ गावांतील शाळांचा समावेश आहे. त्यापैकी ३७ गावांना बारमाही पक्के रस्ते आहेत. तेथे केवळ महामंडळाची बस जात नाही, या निकषावरून ती अवघड ठरली आहेत. वास्तविकपणे त्या गावांमध्ये खासगी वाहनांची रीघ असते, तर काही गावे आंतरजिल्हा मार्गावर असतानाही केवळ मुख्यालयापासून अधिक अंतर असल्याने अवघड यादीत टाकण्यात आली. त्यामुळे बदली धोरणातील निकषच कसे तकलादू ठरत आहेत, याचा उत्तम नमुना त्यातून पुढे आला आहे. महामंडळाची बसफेरी नसलेली गावेपातूर तालुक्यातील गावे मुख्यालयापासूनचे अंतर आणि महामंडळाची बसफेरी नसल्याच्या कारणावरून अवघड ठरली आहेत. त्यापैकी काही गावे अकोला-मेहकर या आंतरजिल्हा मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असलेली आहेत. त्यामध्ये अडगाव, राहेर, पिंपरडोळी, चोंढी घाटमाळ, निर्गुणा प्रकल्प, गोळेगाव, पाचरण, वनदेव, वसाली, सावरगाव, झरंडी, पांगरताटी, वहाळा, पळसखेड, बेलतळा, दोधाणी, कोसगाव, सोनुना, पांढुर्णा, चारमोळी, सांगोळा, रामनगर, खापरखेडा, अंधारसांगवी, शेकापूर या गावांचा समावेश आहे. अवघड क्षेत्र ठरविण्याचे निकषअवघड क्षेत्रातील गाव ठरविण्यासाठी सर्वसाधारणपणे जे गाव तालुक्याच्या मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यासाठी सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम, डोंगराळ भागातील गावे, काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे, असे निकष आहेत.मुख्यालयाच्या निकषातून अवघड ठरलेली सोपी गावे- मुख्यालयापासून अंतराचा निकष लावून अवघड असलेली गावे प्रत्यक्षात किती सोपी आहेत, याची उदाहरणेही आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील सागवी बु., वाकी, वाळकी, लाखोंडा बु., बाळापूर तालुक्यातील मांजरी, मालवाडा ही गावे अकोला शहरातून जवळ, तर तालुक्याच्या ठिकाणाहून लांब आहेत. - धाडी-बल्हाडी गावाला बारमाही रस्ता आहे. काही गावे केवळ केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या आग्रहाने ठरली आहेत.