शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

अन्नधान्याचे ३५ टक्के उत्पादन घटणार!

By admin | Updated: July 15, 2017 02:05 IST

विदर्भातील पेरण्या खोळंबल्या; उलटल्याचा परिणाम

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पिकांची पेरणी खोळंबली असून, पेरलेली पिके उधळल्याने आजमितीस एकट्या विदर्भातील ३० ते ३५ टक्के उत्पादन घटणार आहे. राज्यातील परिस्थितीदेखील चिंताजनक असून, कृषी अर्थव्यवस्थेला हा मोठा फटका मानला जात आहे.राज्यातील खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र १४९.४२ लाख हेक्टर आहे. यातील ८४.३४ लाख हेक्टरवर (५६ टक्के) पेरणी झाली आहे. याचाच अर्थ ४४ लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. दरवर्षी सरासरी ४१.५८ लाख हेक्टरवर तृणधान्याची पेरणी केली जाते. यावर्षी ती १३.५० लाख हेक्टरवरच झाली आहे. कडधान्याच्या २१.०९ लाख हेक्टरपैकी १३.२८ लाख हेक्टर पेरणी झाली आहे. तेलबिया पिकांच्या ३५.३८ लाख हेक्टरपैकी २६.०४ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. राज्यात कापसाचे सरासरी क्षेत्र ४१.२९ हेक्टर आहे. त्यापैकी ३१.३६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. उसाच्या ९.७८ लाखपैकी ०.१६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. विभागनिहाय आकडेवारी बघितल्यास कोकणात १६ टक्केच पेरणी झाली आहे. नाशिक विभागात ५५ टक्के, पुणे ५१ टक्के, कोल्हापूर ५१ टक्के, औरंगाबाद ८६ टक्के, लातूर ७० टक्के, अमरावती ६८ तर नागपूर विभागात ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.अद्याप दमदार व सार्वत्रिक पाऊस नसल्याने विदर्भ, खान्देश तसेच मराठवाड्यातील कापसाचे पीक अखेरच्या घटका मोजत आहे. सोयाबीनची परिस्थितीही तशीच आहे. विदर्भातील खरिपाचे क्षेत्र ५९ लाख हेक्टर आहे. यात पूर्व विदर्भात धानाचे क्षेत्र ७.५ लाख हेक्टर आहे. अद्याप धान पिकाची रोवणी झाली नाही. त्याचा फटका या पिकाला बसला आहे. या पिकाचे उत्पादन हेक्टरी १२ लाख क्विंटल आहे. आजच ३० टक्के उत्पादन घटले आहे.पेरणी अहवालावर निर्बंध?खरीप हंगामातील पेरणीचा अहवाल कृषी विभागातर्फे दरवर्षी जाहीर करण्यात येत होता. तथापि, यावर्षी कृषी विभागाने हा अहवाल देण्यास असमर्थता दर्शविली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ७ जुलैपर्यंतचाच अहवाल कृषी विभागाने प्रसिद्ध केला आहे.पेरण्या खोळंबल्या असून, दुबार, तिबार पेरण्या केल्यावरही पाऊस नाही. परिणामी विदर्भ नव्हे तर राज्यातील ३० टक्क्याच्यावर अन्नधान्याचे उत्पादन आजच घटले आहे.- डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.