शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

क्रमांक व कागदपत्रे नसलेल्या ३५ दुचाकी जप्त

By admin | Updated: April 20, 2016 02:10 IST

ऑटो डीलमधील वाहनांची पोलिसांनी केली तपासणी

अकोला: जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणार्‍या शहरा तील १0 ऑटोडील्सची मंगळवारी पोलिसांनी अचानक तपासणी केली. विनाक्रमांकाच्या, दस्तावेज नसलेल्या आणि वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ३५ दुचाकी या तपासणीत जप्त करण्यात आल्या. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑटोडील्समधील वाहनांसदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दोन महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सर्व ऑटोडील्सचे काम बंद केले होते; मात्र त्यानंतर हा व्यवसाय पुन्हा सुरू झाला असून, मंगळवारी १0 ऑटोडील्समधील वाहनांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्या रामदास पेठ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्या. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे, रामदासपेठचे ठाणेदार सुभाष माकोडे व शहर वाहतूक शाखेचे प्रकाश सावकार यांनी या ऑटोडील्समधील वाहनांची मंगळवारी दिवसभर तपासणी केली. या तपासणीत १९१ दुचाकी आणि १३ चारचाकी वाहनांचे दस्तावेज व इतर तपासणी करण्यात आली. त्यानंतर ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या.