लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील शंभर टक्के हगणदरीमुक्त झालेल्या अकोट, अकोला तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींची तपासणी आंतरजिल्हा मुख्य साधन समूहाकडून केली जात आहे. त्यासाठी वर्धा जिल्ह्याचे पथक दाखल झाले असून, उद्या २५ मेपर्यंत संपूर्ण ग्रामपंचायतींची तपासणी होणार आहे. ग्रामपंचायतींची पातळी दोननुसार २०१६-१७ मध्ये हगणदरीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची तपासणी करण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने ठरवून दिला. त्यानुसार वर्धा येथील खादी ग्रामोद्योग युवा शिक्षण संस्था, चिस्तूर यांची तपासणीसाठी मुख्य साधन समूह म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या पथकाचे पाच सदस्य जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यापैकी पहिल्या दिवशी १७ गावांची तपासणी बुधवारी करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील अन्वी, मिर्झापूर, कौलखेड गोमासे, कौलखेड जहा., म्हैसांग, आपातापा, बिरसिंगपूर, खडका, यावलखेड, बाभूळगाव, निपाणा, सोनाळा, सिसा, मासा, कुंभारी, डोंगरगाव या गावांचा समावेश आहे. उद्या गुरुवारी अकोला तालुक्यातील दोडकी, दुधाळा, बोरगाव खुर्द, खडकी टाकळी, पाटी, निराट, सुकोडा, दापुरा, टाकळी ज., निंबी, कापशी तलाव आणि अकोट तालुक्यातील आलेवाडी, बांबर्डा, बोर्डी, चोहोट्टा बाजार या गावांची तपासणी केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पथकामध्ये संस्था अध्यक्ष राजू होले, प्रशिक्षक राजूभाऊ देशमुख, सुरज लाखे, धीरज लाखे, नीलेश कुरळकर यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत अकोला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे राजेश डहाके, अर्चना डोंगरे, राहुल गोडले, शाहू भगत, व्यंकट जाधव सहभागी आहेत.
हगणदरीमुक्त ३४ ग्रामपंचायतची वर्धा जिल्ह्यातील पथकाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 02:02 IST