शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज ३३ हजार, अनुदानित बियाणे फक्त १५०० शेतकऱ्यांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST

अकोला : अनुदानित बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत जिल्ह्यातील ३३ हजार १७० शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये लॉटरी पद्धतीने निवड करण्यात ...

अकोला : अनुदानित बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत जिल्ह्यातील ३३ हजार १७० शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली असून, केवळ १ हजार ५१४ शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यात येत आहे, तर कृषी सेवा केंद्रावर महाबीजचे सोयाबीन बियाणेही मिळत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. यंदा सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने बियाण्यांचे दरही वाढले आहेत. मात्र, महाबीजने बियाण्यांचे दर कायम ठेवले असून, जिल्ह्यात महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज करून अनुदानित बियाणे मिळत आहे. याकरिता जिल्ह्यातील ३३ हजार १७० शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले होते. या शेतकऱ्याची निवड लॉटरी पद्धतीने झाली आहे; परंतु यामध्ये केवळ १५०० शेतकऱ्यांची निवड सोयाबीन बियाण्यांसाठी झाल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर २ हजार २०६ शेतकऱ्यांची डाळवर्गीय बियाण्यांसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाबीजकडून डीलरला वितरित बियाणेसुद्धा संपले असल्याचे बोर्ड लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

तालुकानिहाय शेतकऱ्यांची झालेली निवड

अकोला २२४

अकोट २१७

बाळापूर २२७

बार्शीटाकळी २०६

मूर्तिजापूर २२४

पातूर २०४

तेल्हारा २१२

परमिट आणल्यावर बियाणे!

लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना एसएमएस प्राप्त झाले आहे. या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परमिट मिळणार असून, परमिट घेऊन संबंधित कृषी केंद्रावर गेल्यास शेतकऱ्यांना सोयाबीनचे अनुदानित बियाणे प्राप्त होणार आहे.

सोयाबीनचे १५८ वाण ठेवावे लागले राखून

कृषी सेवा केंद्र चालकांना महाबीजचे प्रमाणात सोयाबीन बियाणे १५८ वाण वितरित करण्यात आले होते; परंतु हे वाण अनुदानित पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवरील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याने विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे हे ‌वाण कृषी सेवा केंद्र चालकांना विकता आले नाही.

महागडे बियाणे विकत घेण्याची वेळ

सोयाबीन बियाण्यांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांवर महागडे बियाणे विकत घेण्याची वेळ आली आहे. कृषी सेवा केंद्रावर ३३०० रुपयांमध्ये सोयाबीनची बॅग मिळत आहे. त्यामुळे लागवड खर्चही वाढला आहे.

महाबीज बियाण्यांची २२५० रुपयांची बॅग उपलब्ध नाही; मात्र खासगी कंपनीचे ३००० ते ३५०० रुपये किमतीचे बियाणे उपलब्ध आहे. यातून या शासकीय कंपन्या शेतकऱ्यांच्या की व्यापाऱ्यांच्या हा प्रश्न निर्माण होत आहे. यंदा शेतकऱ्याचे उत्पन्न न दुप्पट करता बियाणे, खताचे भाव दुप्पट वाढविले आहेत.

- मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच

सोयाबीनचे सर्व बियाणे काळ्याबाजारात विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे. लॉटरी पद्धतीने वितरित होणारे बियाणे एका गावात एका शेतकऱ्याला मिळते की नाही सांगता येत नाही. त्या तुलनेत खासगी कंपनीचे बियाणे ३२००-३३०० रुपयांनी विकत मिळत आहे.

- कृष्णा अंधारे, संयोजक, शेतकरी जागर मंच