शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

३३ रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा ठराव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 13:44 IST

यासाठीचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत येताच फेटाळण्यात आला.

अकोला : ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूून करण्यासाठी अनेक रस्ते आधीच जिल्हा परिषदेकडून हिरावण्यात आले. आता ३३ रस्त्यांची दर्जोेन्नती करून ती कामे शासनाकडून व्हावी, यासाठीचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत येताच फेटाळण्यात आला. या कामांसाठी जिल्हा परिषदेलाच निधी द्यावा, त्यासाठी जिल्हा परिषद सक्षम आहे, असा पवित्रा सदस्यांनी घेतला.विषय पत्रिकेत नमूद असलेला जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा ठराव होता. त्यावर सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ यांनी आक्षेप घेत या रस्त्यांची कामे जिल्हा परिषनेकडूनच केली जावी, त्यासाठी दर्जोन्नतीचा ठराव न घेता जिल्हा परिषदेला निधी द्यावा, त्यासाठी लेखाशीर्ष उघडावे, अशी मागणी केली. गटनेते गोपाल दातकर यांनी मुद्दा रेटत या ठरावाबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे म्हटले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नियोजन आराखड्यात शेतरस्त्यांची कामे नसल्याने तो मंजूर करू नये, असा पवित्रा गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, गजानन पुंडकर, दातकर यांनी घेतला. या आराखड्याला विलंब झाला. तो मंजूर करणे आवश्यक आहे, त्यामध्ये बदल करावयाचा असल्यास पुरवणी आराखडाही करता येईल, असे सीईओ डॉ. पवार यांनी सांगितले. त्यावर शेतरस्त्यांच्या कामाबाबत ग्रामपंचायतींचे प्रस्ताव, सदस्यांची शिफारस घेऊन पुरवणी आराखडा तयार करा, असे सदस्यांनी सांगितले.- दूधपूर्णा योजनेचा बट्ट्याबोळरोहयोच्या कुशल कामांचा २.७५ कोटी रुपये निधी थकीत आहे. तो तातडीने मिळावा, यासाठी प्रयत्न करा, असे सुलताने यांनी म्हटले. सीईओंच्या निवासस्थानावर केलेला खर्च अति झाला, दूधपूर्णा योजनेचा बट्ट्याबोळ झाला. परिसरात दूध विक्री केंद्र निर्मितीसाठी ५० हजार खर्च केले. त्याला कोण जबाबदार, याची माहिती सदस्य पुष्पा इंगळे यांनी मागितली. त्यावर डॉ. मिश्रा, कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांमध्ये हशा पिकला.

- पाणंद नव्हे शेतरस्तेच करा- सुलतानेपालकमंत्री योजनेतून पाणंद रस्त्यांसाठी केवळ ५० हजार रुपये दिले जातात. त्यातून कोणतीच कामे होत नाहीत. त्यामुळे पाणंद नव्हे तर शेतरस्त्यांचेच प्रस्ताव तयार करा, अशी मागणी ज्ञानेश्वर सुलताने यांनी लावून धरली.

- सभेत मंजूर ठरावहातोला येथे खुले नाट्यगृह बांधकाम पाडणे, कोळासा येथील ग्रामपंचायत पाडणे, नैराट, सांगळूद येथील आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकाम अंदाजपत्रक मंजूर, प्राथमिक आरोग्य केंद्र सस्ती येथे निवासस्थान बांधकाम, तीर्थक्षेत्र कामाच्या प्रस्तावात बदल करणे, सांगळूद येथील इमारत पाडणे, हातोला व हातरूण येथील शिकस्त अंगणवाडी इमारत पाडणे, राहणापूर ते धारूर रस्ता बांधकाम करणे, जितापूर ते करी रूपागड रस्ता बांधकाम, पांढुर्णा नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

- हातपंप दुरुस्तीचा ठरावही पुढील सभेतजिल्ह्यातील हातपंप दुरुस्तीचे काम खासगी कंत्राटी पद्धतीने देण्याच्या ठरावाला सदस्यांनी आक्षेप घेतला. वसुली नसल्याने मंजुरी देऊ नये, असे पुंडकर म्हणाले. त्यामुळे तो पुढील सभेत ठेवला जाणार आहे. वसुली न करणाऱ्या ग्रामपंचायतींची खातेचौकशी करा, अशी मागणी चंद्रशेखर चिंचोळकर यांनी केली.

- दोन समित्यांवर इंगळे यांची निवडजिल्हा परिषदेच्या वित्त व आरोग्य समितीवर सदस्य म्हणून पुष्पा इंगळे यांची निवड करण्यात आली.

 

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदAkolaअकोला