शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

३३ कोटींचे अंदाजपत्रक मंजुर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 02:15 IST

अकोला जिल्हा परिषदेच्या ३३ कोटी २७ लाख ३३ हजार ७00 रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर.

अकोला, दि. २३- जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसह इतर खर्चासाठी मिळून २0१७-१८ मध्ये ३३ कोटी २७ लाख ३३ हजार ७00 रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी अर्थसंकल्पीय सभेत मंजूर करण्यात आले. त्यातून ३१ कोटी ३६ लाख २६ हजार ६00 रुपये खर्च होऊन १ कोटी ९१ लाख ७ हजार रुपये शिल्लक राहणार आहेत, असे जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी सांगितले. अर्थसंकल्पातील तरतूद केलेल्या निधीत काही प्रमाणात फेरबदलाच्या सूचना मान्य करत सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला येत्या वर्षात लागणारा निधी, विभागाच्या खर्चासाठी प्रमुखांनी केलेल्या मागण्यांवरून अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. त्यामध्ये समाजकल्याण विभागासाठी ३,८४,३१000, अपंग लाभार्थींसाठी २८,२८000, कृषी विभाग-२,६४,८८000, महिला व बालकल्याण विभाग-२,८४,३४000, आरोग्य विभाग-१,१५,२४000, बांधकाम विभाग- ४,६४,0२000, शिक्षण विभाग- २,४५,३३६00, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग- ११,0७,५१000, पशूसंवर्धन विभाग-६0,२३000, लघुपाटबंधारे विभाग-२५,८६000 एवढी तरतूद करण्यात आली आहे. त्यातील विविध बाबींसाठी तरतूद केलेल्या निधीत काही प्रमाणात फेरबदल करण्याच्या सूचना सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, गोपाल कोल्हे, शोभा शेळके, प्रतिभा अवचार, सम्राट डोंगरदिवे यांनी मांडल्या. त्यानुसार फेरबदलाला मंजुरी देण्यात आली, तसेच सदस्यांनी मागणी केल्यानुसार नवीन उपक्रमांनाही मान्यता देण्यात आली. शेतकर्‍यांसाठी पाच कोटींची मागणीकृषी विभागाच्या विविध योजनांतून मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी किमान पाच कोटी रुपये या विभागाला देण्यात यावे, त्यासाठी कोणत्या योजनांमध्ये कपात करावी, त्याबाबतची सूचना चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मांडली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत द्या!शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. त्या कुटुंबाना मदत देण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी सदस्या प्रतिभा अवचार यांनी केली. या कुटुंबाना उपजीविकेचे साधन मिळेल, अशी योजना राबवा, असे मत मांडले.कुक्कुटपालनासाठी निधी द्या!काही योजनांच्या तरतुदीमध्ये बदल सुचवत ती तरतूद इतर योजनांवर करण्याच्या सूचना शोभा शेळके यांनी मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने कुक्कुटपालन, शालेय विद्यार्थ्यांना बुट पुरवठा करण्याची मागणी केली.