शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

३१ कर्मचारी गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:24 IST

अकोला : महापालिकेच्या कामचुकार तसेच लेटलतिफ  कर्मचार्‍यांमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होते. कामचुकार  कर्मचार्‍यांबद्दलच्या तक्रारी ध्यानात घेता, महापौर विजय अग्रवाल  यांनी शुक्रवारी सर्व विभागांची अचानक झाडाझडती घेतली. यावेळी  चक्क ३१ कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनास आले. संबंधित  कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश महापौर  अग्रवाल यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. 

ठळक मुद्देमहापौरांनी घेतली झाडाझडती एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या कामचुकार तसेच लेटलतिफ  कर्मचार्‍यांमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होते. कामचुकार  कर्मचार्‍यांबद्दलच्या तक्रारी ध्यानात घेता, महापौर विजय अग्रवाल  यांनी शुक्रवारी सर्व विभागांची अचानक झाडाझडती घेतली. यावेळी  चक्क ३१ कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनास आले. संबंधित  कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश महापौर  अग्रवाल यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. महापालिकेच्या आस्थापनेवर २ हजार २00 पेक्षा अधिक कर्मचारी  कार्यरत आहेत. यापैकी स्वच्छता विभागात ७४८ सफाई कर्मचारी  कार्यरत आहेत. सदर कर्मचारी दिवसभर बाहेर असले, तरी उर्वरित  कर्मचार्‍यांची संख्या पाहता प्रशासकीय कामकाज करताना एवढय़ा  मोठय़ा प्रमाणातील मनुष्यबळाचा अभाव दिसून येतो. प्रशासनाने  झोननिहाय कार्यालयांचे गठन केले असून, याठिकाणी किमान २0  कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असले तरी महा पालिकेच्या वतरुळातून उर्वरित कर्मचारी नेमके जातात कोठे, असा  सवाल उपस्थित होतो. मनपाच्या जलप्रदाय, सार्वजनिक बांधकाम,  नगररचना विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी  विभाग, लेखा व वित्त विभागासह आरोग्य व स्वच्छता विभागासह इ तर ठिकाणी बोटावर मोजता येणारे कर्मचारी कार्यरत असल्याचे  दिसून येते. कामचुकार कर्मचारी गायब असल्यामुळे त्यांच्या  कामकाजाचा अतिरिक्त ताण इतर कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो.  यासंदर्भात कर्मचार्‍यांच्या तक्रारी लक्षात घेता महापौर विजय  अग्रवाल यांनी शुक्रवारी अचानक सर्व विभागांची झाडाझडती घे तली. सामान्य प्रशासन विभागातील हजेरी पुस्तिका, कर्मचार्‍यांनी  सादर केलेले रजेचे अर्ज, त्यांच्या नोंदी तसेच हलचल पुस्तिक ा त पासल्या असता अनेक कर्मचारी नियमांना धाब्यावर बसवून गायब  झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. यावेळी स्थायी समिती सभाप ती बाळ टाले, नगरसेवक अमोल गोगे, दिलीप मिश्रा उपस्थित होते. 

कर्मचार्‍यांची बनवाबनवी उघडमहापौर विजय अग्रवाल यांनी विविध विभागातील हजेरी पुस्तिका त पासल्या असता, त्याचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आले. हजेरी  पुस्तिकेवरील नावासमोरच्या जागेवर कोणतीही नोंद न करणार्‍या  कर्मचार्‍यांनी कारवाईपासून वाचण्यासाठी रजेचे अर्ज सादर केल्याचे  दिसून आले. असे अर्ज प्रशासनाने मंजूर केल्यानंतर रजा घेता येते.  यातील बहुतांश अर्जावर प्रशासनाने कोणताही शेरा नमूद केला  नसल्याचे समोर आले.

कामचुकार कर्मचार्‍यांची नावे उघड झाली आहेत. त्यांचे एक  दिवसाचे वेतन कपात करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.  यानंतर सेवापुस्तिकेत नोंदी कराव्या लागतील, याचे कर्मचार्‍यांनी  भान ठेवावे.-विजय अग्रवाल, महापौर