शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापुरातील गोदामातून ३० लाखांचा अवैध धान्य साठा जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:14 IST

गोडाऊनवर छापा घालून तब्बल ४0 लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त केला.

मूर्तिजापूर : येथील जे. के. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या रेशनचा धान्यसाठा साठवून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास गोडाऊनवर छापा घालून तब्बल ४0 लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त केला. जप्त केलेल्या धान्यात शालेय पोषण आहाराचाही साठा आहे.शहर पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावरील जे.के. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या गोडाऊनवर छापा घातला असता, गोडावूनमध्ये महाराष्ट्र शासन व भारत सरकार असे अंकित केलेले ५०२ क्विंटल गहू, ३८४ क्विंटल तांदूळ, ७३.५ क्विंटल मका, १२,५ क्विंटल चणा व इतर धान्य साठा, अडीच हजार रिकामी पोती व ३ चारचाकी मालवाहू वाहन असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यात शालेय पोषण आहारातील अन्नधान्य व हळद, मूग, जिरे, डाळ याचाही समावेश असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली. सदर माल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई तहसीलदार मूर्तिजापूर करीत आहेत. सदर धान्य साठ्याची काळ्याबाजारात विक्रीसाठी साठवणूक करण्यात आली असल्याने, जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत अशा कारवायांसाठी तक्रार दाखल करणे महसूल विभागाचे कार्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात अद्यापही कोणावरही कारवाई करण्यात आली नसून, याबाबत पुरवठा विभाग काय भूमिका घेते, यावर पुढील कारवाई अवलंबून आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक आशीष शिंदे, पोलीस कर्मचारी सलमान शेख, पंकज पांडे, हरिशंकर शुक्ला, श्याम मोहाळे यांनी केली. आढळून आलेल्या धान्य साठ्यात शालेय पोषण आहाराचा समावेश आहे. यासंदर्भात कागदपत्रे पडताळणीस सादर करण्यासाठी काही लोकांना सुचविण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पुरावे पुरवठा विभागाकडे सादर न झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करतील.- प्रदीप पवारतहसीलदार, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर