बाळापूर - तालुक्यातील बारलिंगा येथील भोसला एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाने १३ कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याचे प्रकरण प्रकाशात आले आहे. भविष्य निर्वाह अधिकारी अजय पहाडे यांनी या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, नागपूर येथे मुख्यालय असलेल्या भोसला एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्ष इंदिरा राजे भोसले आहेत. बारलिंगा येथे या संस्थेची शाखा आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या १३ कर्मचार्यांची रक्कम व्यवस्थापनाने जीपीएफ कार्यालयात भरलीच नाही. ही बाब जीपीएफ अधिकारी अजय पहाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी चौकशी केली व यामध्ये ३ लाख ४२ हजार ४२० रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
भविष्य निर्वाह निधीत ३ लाखांचा अपहार
By admin | Updated: May 28, 2014 22:15 IST